श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाचे यश बारावीचा निकाल ८५.०५ टक्के

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी .

येथील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची यशस्वी परंपरा या वर्षीही कायम राहिली आहे. कला ,वाणिज्य ,व्यावसायिक अभ्यासक्रम व विज्ञान शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांची गुणवत्ता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये कायम ठेवली आहे सर्वच विभागातील निकाल उत्कृष्ट लागला आहे
महाविद्यालयातील एकुण निकाल 85.05 टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल 77.70 लागला आहे त्यात कला शाखेतील कऱ्हाळे नवीनकुमार भगवान या विद्यार्थ्याने 83.67 % गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर भक्ती मुंजाजी मुळे या विद्यार्थिनी 81.17% गुण घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला , तर वाणिज्य शाखेचा निकाल 100% लागला आहे .वाणिज्य शाखेत कु बुचाले गायत्री रमेश या विद्यार्थिनी 91.67 गुण घेऊन प्रथम आली आहे तर कु ढोणे संध्या माधव या विद्यार्थिनींनी 81.33 गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
तर विज्ञान शाखेचा निकाल 93.77 लागला आहे या शाखेतील महाजन वोमीत अरविंद या विद्यार्थ्याने 81% टक्के गुण घेतले असून झिनत अतिक खान पठाण या विद्यार्थिनींनी याने 76.33% घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 71.92 लागला असून व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शेख इरफान अजीज या विद्यार्थ्याने 82.17 गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे.तर बोकारे श्रुती रघुनाथ हिने 70.33 गुण घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून त्याच्या या नेत्र दीपक कामगिरीबद्दल श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी ,कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, कोषाध्यक्ष उत्तमराव कदम ,सहसचिव प्रा. गोविंदराव कदम, प्राचार्य डॉ के राजकुमार, उपप्राचार्य डॉ शिवसांब कापसे, उपप्राचार्य डॉ गजानन कुरुंदकर, पर्यवेक्षक श्री मिटकरी यु पी, उपप्राचार्य खराटे व सर्व प्राध्यापकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page