म. फुले व डॉ. आंबेडकर नगर डी वाय एफ आय समितीकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन!
म. फुले व डॉ. आंबेडकर नगर डी वाय एफ आय समितीकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन!
म. फुले नगर व डॉ. आंबेडकर नगर या दोन्ही नगरांतील तसेच शहरातील इतर ठिकाणच्या विविध समस्यांना घेऊन म. फुले व डॉ. आंबेडकर नगर DYFI समितीकडून आज नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश आहे. १. म. फुले नगर व डॉ. आंबेडकर नगर येथील कचऱ्याची सातत्याने विल्हेवाट लावा व नाल्यांची नियमितपणे सफाई करा! २. दोन्ही नगरांत व पूर्णेत इतर ठिकाणी सुद्धा नवीन विद्युत खांब उभारले आहेत त्यावर ताबडतोब विद्युत दिवे बसवा तसेच ज्या ठिकाणी विद्युत खांब उभारले नाहीत तिथे उभारा व त्यावरही विद्युत दिवे बसवा! ३.अजीज नगर, मस्तानपुरा, भिम नगर, अण्णाभाऊ साठे नगर येथील नाल्यांची स्वछता नियमितपणे करा व कचऱ्याची सातत्याने विल्हेवाट लावा. ४. शहरात विविध ठिकाणी पाणी उपलब्ध करा व उपलब्ध असलेल्या पाण्याचे नीट नियोजन करा! ५. विभागनिहाय अनिश्चित वेळांमुळे वाया जाणारे पाणी वाचवा आणि विभागनिहाय गरजेनुसार आणि संबंधित ठिकाणच्या चढ-उतारानुसार वेळा निश्चिती करा! ६. शहरातील जुन्या झालेल्या पाईपलाईन्समुळे ठिकठिकाणी पाणी वाया जात असल्यामुळे त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करा! ७. शहरासाठी मंजूर झालेल्या फिल्टरचे काम ताबडतोब सुरु करा व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्य! ८. पाण्याच्या सर्व समस्या दूर करून कधी काही कारणास्तव पाण्याची समस्या निर्माण होत असेल तर नागरिकांना नियमितपणे दवंडीद्वारे(announcement) कळवित जा!
निवेदनावर जिल्हासचिव नसीर शेख, म. फुले व डॉ. आंबेडकर नगर DYFI समितीचे अध्यक्ष अमोल पट्टेकर, सचिव सुबोध खंदारे, सहसचिव वैभव जाधव, सचिवमंडळ सदस्य विजय कांबळे,
सदस्य तेजस खंदारे, शुभम गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.