जांभूळ बेटाच्या विकासासाठी खा. जाधवांकडून १० कोटींचा निधी
परिसरातील रस्त्यांसह ईतर कामांना प्रत्यक्ष सुरुवात;जांभूळ बेटचा होणार कायापालट.
पूर्णा(प्रतिनिधी)
जांभुळबेट संवर्धन समितीच्या मागणीला मान देऊन खा.संजय उर्फ बंडू जाधव यांनी विकास निधीतून १० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली असून, परिसरातील रस्त्यांसह विविध विकासकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याची माहिती जांभूळबेट सवर्धन समितीचे कृषीभूषण कांतराव देशमुख यानी दिली आहे.
पूर्णा पालम तालुक्याच्या सिमेवर गोदापात्रात असलेल्या निसर्गरम्य जांभूळ बेटाचा कायापालट करण्यासाठी खा.संजय जाधव सरसावले आहेत.परभणी जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असणारे आणि पर्यटकाना नेहमीच साद घालणारे जांभुळबेट हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. परभणी जिल्ह्यातील पालम आणि पूर्णा तालुक्यांना स्पर्श करून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या मध्यभागी असणारे हे बेट म्हणजे जैवविविधतेचा उत्तम असा नमुना होय. मध्यंतरीच्या काळात जांभूळ बेटाला पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे सर्व बाजूनी नुकसान पोहोचले होते. पर्यटकांना तिथे पोहोचण्यासाठी कसलीही व्यवस्था नव्हती. मात्र जांभुळबेट संवर्धन समितीने कृषिभूषण कातराव झरीकर यांच्या पुढाकांरातून जांभूळ बेटावर अनेक सुविथा निर्माण केल्या. दिग्रस बंधाऱ्यामुळे भरपूर पाण्याची साठवण होत आहे. समितीने बोटीची व्यवस्था केली. सोयी सुविधा निर्माण झाल्यामुळे पर्यटकांचा ओढा मागील चार वर्षापासून वाढला आहे. आता खा. संजय जाधव यानी आपल्या स्थानिक विकास निधींमधून १० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.
जांभूळ बेट समीतीने मानले खा.जाधवांचे आभार..
खा. संजय जाधव यांच्या विकास निधीतून मूलभूत सुविधा पर्यटकांसाठी निर्माण होतील आणि पर्यायाने पर्यटकाची पाऊले जाभूळ बेटाकडे निश्चित वळतील अशी आशा निर्माण झाली आहे. सोमेश्वर ते जांभुळबेट हा मुख्य रस्ता तसेच जांभूळ बेटावर, पेव्हर ब्लॉक, स्वच्छतागृह, वृक्षारोपण, शेड आदि सुविधांसाठी हा विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जांभुळबेट संवर्धन समिती आणि परिसरातील नागरिकांनी खा. संजय जाधव यांचे आभार व्यक्त केले आहेत.