पुर्णा तालुक्यातील मस्जीतचे हाफीज तसेच मौलाना यांच्या सोबत पोलिस प्रशासनाची मार्गदर्शक बैठक संपन्न
पुर्णा तालुक्यातील मस्जीतचे हाफीज तसेच मौलाना यांच्या सोबत पोलिस प्रशासनाची मार्गदर्शक बैठक संपन्न
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘रमजान महिन्यात’ स्वतःसह कुटुंबाची काळजी घेण्यासंदर्भात केले मार्गदर्शन
पुर्णा (दि.१६ एप्रिल) – संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यातही कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून जिल्ह्यात प्रतिरोज शेकडोच्या संख्येने कोरोनाबाधीत रुग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनही कमालीचे सतर्क झाले असून सर्वसामान्य जनतेला कोरोना महामारीच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना पाहावयास मिळत आहे.
कोरोना महामारीच्या या काळातच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाल्याने आज शुक्रवार दि.१६ एप्रिल २०२१ रोजी दुपारच्या सुमारास पुर्णा पोलिस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक भागोजी चोरमले यांनी पुर्णा पोलिस स्थानकात तालुक्यातील सर्व मस्जीतचे हाफीज इमाम मौलाना यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते यावेळी पोनि.चोरमले यांनी जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या भयंकर उद्रेका संदर्भात सर्व मुस्लीम मौलाना हाफीज इमान यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी त्यांनी कोरोना महामारी बदल मार्गदर्शक सूचना ही केल्या व प्रशासकीय निर्देशांचे पालन करीत स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाच्या तसेच समाजाच्या सुरक्षिततेची जवाबदारी पार पाडावी असेही आवाहन केले तसेच समस्त मुस्लिम बांधवांना या वाढत्या कोरोना महामारी संदर्भात समजावून सांगावे असेही या वेळी सुचित केले यावेळी पोलिस प्रशासनाच्या या सुचनांचा सकारात्मक विचार करून प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले जाईल असे बैठकीस उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले सदरील बैठक यशस्वी करण्यासाठी गोपनीय शाखेचे अंमलदार गिरीष चन्नावार,समीर अख्तर पठाण यांनी विशेष भुमिका पार पाडली…