गुड न्युज : धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यात येणार 10 हजार रेमडीसीविर
गुड न्युज : धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यात येणार 10 हजार रेमडीसीविर
परळीत येणार 3000 रेमडीसीविर, खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजूंना ‘नाथ प्रतिष्ठान’ देणार मोफत रेमडीसीवीर
परळी (दि. १६) —- : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी व कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांची होणारी धावपळ थांबावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून 10 हजार रेमडीसीविर जिल्ह्यात उपलब्ध होणार आहेत.
परळी मतदारसंघात शासन नियमाच्या अधीन राहून 3 हजार रेमडीसीविर उपलब्ध होणार असून, परळी शहरात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत हे इंजेक्शन आवश्यकतेनुसार मोफत उपलब्ध करून देणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
सध्या जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा व पर्यायाने काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये औषध प्रशासन विभागामार्फत आवश्यक इंजेक्शन उपलब्ध करण्यात येतात. मात्र खाजगी रुग्णालयांमध्ये मात्र रुग्ण व नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी औषध प्रशासन विभाग, उत्पादक व वितरक यांच्याशी समन्वय साधून शासन नियमांच्या अधीन राहून जिल्ह्यासाठी आगाऊ 10 हजार इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली केल्या आहेत. हे इंजेक्शन शासकीय यंत्रणेद्वारे वितरकांमार्फत खाजगी रुग्णालय व नातेवाईकांना दिली जाणार आहेत.
तीन हजार इंजेक्शन हे शासन नियमाच्या अधीन राहून परळी मतदारसंघातील गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील व या इंजेक्शनचा खर्च ना. मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत केला जाईल, अशी माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
पालकमंत्र्यांच्या कोरोना हेल्प सेंटरची हजारोंना मदत
दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामार्फत ना. मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या कोरोना हेल्प सेंटरच्या माध्यमातून अविरतपणे रुग्णांची विचारपूस करणे, त्यांना बेड, गरजेनुसार ऑक्सिजन-व्हेंटिलेटर, रेमडीसीविर आदी उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे हे कार्य सुरूच असून यामार्फत हजारो रुग्णांना मदत करण्यात येत आहे.
ना. धनंजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड यांच्यासह परळीतील रा. कॉ. चे प्रमुख पदाधिकारी व ना मुंडेंच्या कार्यालयातील कर्मचारी यासाठी अविरत प्रयत्नशील असून, परळी, बीडच नव्हे तर राज्यभरातून मदतीसाठी फोन येतात व त्यांना मदत केली जाते. अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये विविध योजनांचा लाभ तसेच बिलात सवलत मिळवून देणे याबाबतचीही अनेक उदाहरणे या हेल्प सेंटरच्या माध्यमातून समोर आली आहेत. तसेच स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या नावे सर्व सुविधा युक्त 50 बेडचे कोविड केअर सेंटर देखील उभारण्यात येत आहे.