संभाजीनगर व शहर पोलिसांनी केले परळी शहरात पथसंचलन रूट मार्च
संभाजीनगर व शहर पोलिसांनी केले परळी शहरात पथसंचलन रूट मार्च सह पाहणी
मोकाट विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कार्यवाही
परळी/ प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने मा.मुख्यमंत्री साहेबांनी दि.14 एप्रिल ते 1 मे पर्यंत कडक निर्बंध नियमासह संचारबंदी लागू केले असून यात शनिवार रविवार मेडिकल वैद्यकीय सेवा वगळता संपूर्ण व्यापार बंद ठेवण्यात यावे असे आदेश काढले या नियमांचे कठोर अंमलबजावणी करत परळी शहरात पोलीस प्रशासनाने आज सर्वत्र पथसंचलन केले शहरातील पोलीस स्टेशन ते राणीलक्ष्मीबाई टॉवर, गणेशपार,मार्गे पथसंचलन केले आहे.
शहरात सध्या नियमांचे पालन न करणाऱ्यावर कडक कार्यवाही केली जात आहे शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील नेहरूतळ, लक्ष्मीबाई टॉवर,बाजारसमिती,बसस्टँड, शिवाजी पुतळा,आझाद चौक,सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असून आज शहरात संभाजीनगर पोलीस व शहर पोलिसांनी संमिश्र पथसंचलन रूट मार्च केले आहे.या रूट मार्च ने आता मोकाट विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही होणार आहे.