श्री दत्ताप्पा इटके व परिवाराकडून ‘वीरशैव समाजासाठी कैलास रथ समर्पित
श्री दत्ताप्पा इटके व परिवाराकडून ‘वीरशैव समाजासाठी कैलास रथ समर्पित
“””””‘’””””””””””””‘”””””””’
परळी दि. 14: वीरशैव समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक तथा महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष श्री दत्ताप्पा इटके परिवाराने वीरशैव समाजाच्या सेवेत कैलास रथाचे आज अक्षय तृतीया व महात्मा बसवेश्वर महाराज जयंती दिनी समर्पण केले.
वीरशैव समाजासाठी असलेल्या पूर्वी च्या कैलास रथाची अडचण श्री दत्ताप्पा इटके गुरुजींच्या लक्षात आली व इटके परिवाराने या कैलास रथाचे समाजासाठी समर्पण केले.
परळीकर गॅरेज चे मालक श्री अरविंद बेल्लाळे यांनी अत्यंत सुबक पद्धतीने बांधणी केलेला हा कैलास रथ आज शहराच्या लोकप्रिय नगराध्यक्ष व समाजाच्या जेष्ठ मार्गदर्शिका सौ. सरोजनीताई हालगे यांच्या हस्ते वीरशैव समाजाच्या वीरशैव विकास प्रतिष्ठान परळी वै. या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून आरती करण्यात आली व मा. श्री. दत्ताप्पा इटके , श्री अरविंदप्पा बेल्लाळे (परळीकर) , वाहन चालक श्री. बाबासाहेब कसबे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक अंतर राखुन झालेल्या या कार्यक्रमास श्री शिवकुमार व्यवहारे, मा.नगर सेवक कमलाकर हरेगावकर,माणिक आप्पा हालगे,बापू खोत, श्री आत्मलिंगप्पा शेटे वीरशैव विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.शाम बुद्रे, उपाध्यक्ष श्री शिवकुमार केदारी, सचिव श्री सुधीर फुलारी, कोषाध्यक्ष श्री महेश निर्मळे, सहसचिव श्री विकास हालगे संचालक श्री महादेव इटके, शिवशंकर झाडे, नागेश हालगे, तसेच अरविंद बेल्लाळे, सुशील हरंगुळे, नरेश साखरे, सचिन स्वामी, प्रकाश खोत, शिवकुमार चौंडे,गजानन राजनाळे आदि समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञ संचलन युवा नेते श्री सचिन स्वामी यांनी केले.
या पुढे या कैलास रथाची संपूर्ण देखभाल वीरशैव विकास प्रतिष्ठान परळी कडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती महादेव इटके यांनी दिली.