हैदराबाद बँकेचे सेवानिवृत्त मुख्य रोखपाल रखमाजी शिंदे यांचे दुःखद निधन
हैदराबाद बँकेचे सेवानिवृत्त मुख्य रोखपाल रखमाजी शिंदे यांचे दुःखद निधन
परळी (प्रतिनिधी)…
येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा परळीचे सेवानिवृत्त मुख्य रोखपाल रखमाजी अंबादासराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले असून या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुःखद घटनेबाबत अधिक माहिती अशी की, येथील प्रियानगर येथील रहिवाशी तथा स्टेट बँक ऑफ हैदराबाद परळी शाखेचे सेवानिवृत्त मुख्य रोखपाल रखमाजी अंबादासराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद या ठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार घेताना दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 70 वर्ष होते.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे रखमाजी शिंदे यांच्या निधनाने शिंदे परीवार व आप्तस्वकीयांमध्ये शोककळा पसरली असून या दुःखद घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सुन, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके यांचे ते भाऊजी होत. शिंदे परिवाराच्या दुःखामध्ये दैनिक ..... परिवार सहभागी आहे.