सेवानिवृत्त शिक्षक उत्तम बांगर यांचे निधन
सेवानिवृत्त शिक्षक उत्तम बांगर यांचे निधन
परळी वैजनाथ – शहरातील गणेशपार भागातील रहिवासी असलेले उत्तम भगवानराव बांगर यांचे काल गुरुवार दि.20 रोजी रात्री 8 च्या सुमारास निधन झाले.मृत्यसमयी ते 72 वर्षांचे होते.जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत त्यांनी अनेक वर्षे शिक्षक म्हणून आपले कर्तव्य पार पाडले.
गणेशपार येथील मूळ रहिवासी असलेले उत्तम बांगर यांचा सर्वदूर परिचय होता.गेले काही वर्षांपासून ते पुणे येथे वास्तव्यास होते.
गुरुवारी रात्री हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.बांगर यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी, 2 मुले असा परिवार आहे.त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात महासमाचार न्युज परिवार सहभागी आहे.