कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडणून आणा-मनोजदादा जरांगे पाटील
कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडणून आणा-मनोजदादा जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली
विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घ्यायचा सोमवारी शेवटचा दिवस आहे, त्याआधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आज, सकाळी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील उमेदवारांच्या यादीची घोषणा न करता सगळ्यांना धक्का दिला.
जरांगे पाटील यांनी म्हटले, मध्यरात्री उशिरापर्यंत यादी आली नव्हती. आमचे 14 उमेदवार आणि इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत चर्चा झाली नाही. त्यांची यादी न आल्याने एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपं नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. या समाजासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी जरांगे यांनी आपल्या काही जागा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आज उमेदवारांची नावे जाहीर होणार होती. मात्र, मित्रपक्षांनी उमेदवारांची नावे न पाठवल्याने आपण एकाच समाजाच्या मतांवर आणि एकाच समाजाचे प्रतिनिधीत्व म्हणून निवडून जाणे योग्य ठरणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, आपलं आंदोलन सुरूच आहे, पुन्हा एकदा निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी म्हटले की, एकाच जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही. रात्री तीन तास चर्चा झाली. एका जातीवर जिंकणं आपण जिंकू शकत नाही. एकट्याने कसं लढायचं असे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, याला आणि पाड म्हणायची इच्छा नाही. लोकांना जे करायचं ते करा, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडणून आणा असे सूचक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. आम्ही मतदारसंघ ठरवले होते. फक्त उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी होते. निवडणुकीतून माघार घेतली नसून याला तुम्ही गनिमी कावा म्हणू शकता असे जरांगे पाटील यांनी म्हटले.