रेल्वेगाडीच्या धडकेत अनोळखी वृद्धाघा मृत्यू
पूर्णा स्थानकापासून काही अंतरावर घडली घटना;पोलीसांनी घटनेची नोंद
पूर्णा/प्रतिनिधी
पूर्णा ते मिरखेल रेल्वे लोहमार्गावरधावणाऱ्या एका रेल्वे गाडीची धडक लागून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ५:३० ते ६ वाजेच्यादरम्यान घडली. पूर्णा रेल्वेस्थानकापासून पश्चिम दिशेला असणाऱ्या दमरेच्या रेल्वे लोहमार्गावर आज पहाटे ५:३० ते ६ वाजेच्या सुमारास आदिलाबादला गाडी रुळावरून धावत होती. यावेळी पूर्णा ते मिरखेल रेल्वेस्टेशनमधील मार्गात एका ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीची या रेल्वेला धडक बसून त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या अंगामध्ये सुती कपड्याची शिवलेली पांढऱ्या रंगाची बनियन, पांढऱ्या रंगाचा खमिस व धोतर असा पोशाखाची वेशभूषा असून, पांढरी दाढी आहे. यावरून मृत व्यक्तीची ओळख पटल्यास त्यांच्या नातेवाईकांनी पूर्णा पोलीस ठाण्यात कळवावे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनात जमादार मजमले करीत आहेत.