पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधनशोकाकुल वातावरणात नागापूर खुर्द येथे अंत्यसंस्कार
पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधन
शोकाकुल वातावरणात नागापूर खुर्द येथे अंत्यसंस्कार
बीड /प्रतिनिधी
येथील सायं दैनिक बीड सरकारचे उपसंपादक तथा मराठी पत्रकार परिषदेचे बीड तालुका सरचिटणीस नागापूर खुर्द येथील रहीवाशी चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४४ वर्षे होते.
येथील सायं दैनिक बीड सरकार येथे उपसंपादक म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत साळुुंके हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गावाकडे जात असताना त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. अपघात एवढा भिषण होता की, प्रथम त्यांना बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर मंगळवारी सकाळी 7च्या सुमारास घाटी रुग्णालयात उपचार चालु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. चंद्रकांत साळुंके यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. चंद्रकांत साळुंके यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्याच्यावर नागापूर खुर्द येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गावातील सर्व नागरीक, अनेक पक्षाचे नेते,संपादक ,पत्रकार ,डाक्टर, वकील ,शिक्षक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थीत होते.