सदसद्विवेकबुद्धी असलेला मतदार जातीपातीच्या पुढे जाऊन मतदान करेल?
सदसद्विवेकबुद्धी असलेला मतदार जातीपातीच्या पुढे जाऊन मतदान करेल?
…………………………………….
महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीतच लोकप्रिय चेहरा तो काही असाच होत नाही.त्यामागे मोठा संघर्ष असतो. राजकीय वारसा पिढीने मिळाला असला तरी स्वतः सिध्द झाल्याशिवाय जनता सहजासहजी स्वीकारत नाही.ही काळ्या दगडावरची पांढरी रेष.या संघर्षातून स्वतः ला सिध्द केलेलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतः च वलय निर्माण करणारं परळीच्या आणि बीडच्या किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलं आहे. सध्या विधानसभा निवडणूक रणधुमाळीचा बिगूल जोर धरला आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा आणि उमेदवारांचा कस लागलाय. पण,कधी नव्हे ते मतदारांचाही कस लागलाय. कारण, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विकासावरती निवडणूक व्हायला हवी होती पण ती दिसली नाही.तोच कित्ता याही म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गिरवला जाणार हे निश्चित झाल्याच मतदारांच्या बोलण्यातून आणि गावागावांतील पार, चौकातून चर्चिला जातो आहे.हे चित्र जवळजवळ सर्व मतदारसंघात म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुंबईतील ३६ मतदारसंघात थोडाफार फरक किंवा अपवाद असेल.यात दूमत असू शकतं. निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर व्हावी?असा सवालही कुणी करतांना दिसत नाही. आजी -माजी लोकप्रतिनिधींनी कांहीच मतदार संघात विकास केला नाही?असा सवाल व्हायला हवा.तसा सवाल कुठेच ऐकू येत नाही. पिढ्यानपिढ्या प्रस्थापित समाजाने कोणावर तरी अन्याय करून गुलाम बनवले आणि ती गुलामगिरी प्रत्येक समाजातून नष्ट करण्यासाठी अनेकांनी आपापल्या समाजात विचार परिवर्तन केले.तेव्हा कुठे समाजासमाजात ऐकोपा वाढला आणि त्यास कायद्याचाही धाक राहिला. आज पुन्हा जातीचा संघर्ष पेटू पाहतोय आणि समाजा-समाजातील एकोपा दूरावला जातोय.त्याचा परिणाम आज खोलवर रुजू लागलाय. देशात किंवा महाराष्ट्रात राजकारण आज होत आहे असे नाही.पण,कधी जातीकड पाहून आजवर कुणी मतदारांनी कौल दिलेला नाही.हे तितकेच खरे. विकासाची दृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधींना जनतेने सभागृहात पाठवले आहे.आता लोकप्रतिनिधींचा प्रामाणिकपणा हा त्या लोकप्रतिनिधींकडे ! याला मतदार पुन्हा जागा दाखवू शकतील.हा मुद्दा पुढे करून कोणी मतदान करत असेल तर तो आज सापडणेही अशक्य. आज जातीचा संघर्ष पेटू पाहत असल्याने लोकप्रतिनिधी निवडून आणण्यातही जात हाच निकष ठरवला जातो आहे.हे विष नेमके राजकारणात उतरते कसे?हा प्रश्न.
संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. पण,त्याचा स्वैराचार होतो आहे का?याचेही भान अभिव्यक्त होताना ठेवले गेले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला अभिव्यक्त होण्यास अनुकूल होईल.अन्यथा नेत्याची एकमेकांवरची टिका अगदी बिघडून गेली आहे.असो, आजवर ओबीसींनी मराठा उमेदवार निवडून दिले, मराठ्यांनी ओबीसी निवडून दिले , अनुसूचित जाती -जमाती उमेदवार ओबीसी मराठा बांधवांनी निवडून दिले , अल्पसंख्याक मतदारांनी कधीच लोकप्रतिनिधी ची अपेक्षा न ठेवता सर्व समाजाच्या उमेदवारांना निवडून दिले.हे का, कशासाठी?हा जातीय सलोखा डिजिटल जमान्यात मान्यता देत नाही? महाराष्ट्रात जात कधीच निवडणुकीत मुद्दा झालेली नव्हती.हे खूळ नेमकं आलं कस?आपण पुन्हा जाती-पातीत अडकतोय ?परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवार ठरण्यापासून राज्याचं लक्ष लागून आहे.एका उमद्या ओबीसी नेत्याला,जो भविष्यात मुख्यमंत्री होण्याची पावलं असताना त्याला चक्रव्यूहात अडकविण्यासाठी अमूक पक्षाची सगळी यंत्रणा काम करते.ही बाब परळी विधानसभेतील मतदारांच्या लक्षात येणार नाही का? राज्याच्या आश्वासक नेत्याला अडविण्यासाठी काही विकासात्मक कामं केली नाहीत? यावर अडवणूक करणं शक्य नसल्याचं विरोधकांच्या लक्षात येताच.या निवडणुकीला वेगळं वळण देण्याच काम लोकसभेच्या निवडणुकीपासून सुरू होत.हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण,परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेला विकासाचा लोकप्रतिनिधी २०१९ ला गवसला आणि विकासाची दूरदृष्टी धनंजय मुंडे यांच्यात दिसली. जनता तितकी दूधखुळी नक्कीच नाही.जो परळीचा चेहरा भविष्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तो विकासाभिमुख आणि आश्वासक चेहरा जो प्रत्येक राजकीय पक्षाला हवा आहे. परळी मतदारसंघातील असं एकही गावं,वाडी, तांडा नाही जिथं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या फंडातून काही काम झाले नसेल.विविध समाजासाठी सभागृह, सिमेंट बंधारे, सिमेंट रस्ता, समाज मंदिर , पिण्याच्या पाण्यासाठी निधी दिला.यात अमूक अमूक जातीचा उल्लेख कुठेही नाही.एखादा समाज उघड उघड विरोध करूनही त्यांनी कधी अमूक समाजाचा म्हणून निधी अडवला नाही.ते करता आले नसते का?हा प्रश्न.राज्याच लक्ष असलेल्या या संवेदनशील मतदारसंघातील विद्यमान आमदार मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी एवढी यंत्रणा डोळे लावून आहे यावरून ना.धनंजय मुंडे यांच राजकीय वलय आणि राजकीय स्थान काय असेल याची कल्पना नक्कीच मतदारांना आली असेल.परळी मतदारसंघातील सजग , सदसद्विवेकबुद्धी असलेला मतदार जातीपातीच्या पुढे जाऊन भविष्यातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून परळीला पुढे करतील? हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल!
- पदमाकर उखळीकर ,
मो.९९७५१८८९१२.