ग्राहकांना कर्जासाठी इन्शुरन्स पाॅलीसीची सक्ती कशासाठी..!
पूर्णेतील प्रकार; कर्मचाऱ्यांच्या मनमानीपणाला ग्राहक वैतागले;वरीष्ठांनी लक्ष देण्याची गरज
पूर्णा(प्रतिनिधी)
येथील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये शेतक-यांसह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बँकेत गेल्यानंतर त्यांना बँक कर्मचारीच विविध विमा पॉलिसी काढण्याचा आग्रह करत सक्ती करत असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून जोरात असल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य व्यापारी, कर्मचारी अक्षरशः जेरीस आले आहेत.कर्ज प्रकरणासाठी विमा पाॅलीसीची सक्ती करणा-या एजंटवर त्वरित कठोर कार्यवाही करण्याची मागणी बँक ग्राहकांकडून केली जात आहे.
पूर्णा तालुक्यातील ताडकळस,पूर्णा,येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसह बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखा आहेत.याशाखांमध्ये तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी,व्यापारी, कर्मचारी, बेरोजगार तरुण,तरुणी असे हजारों खातेदार ग्राहक आहेत.त्यापैकी अर्थिक समतोल ठासाळलेले काही शेतकऱी ,व्यापारी,दरवर्षी पिकं कर्ज, पाईप लाईन,वाहन कर्ज घेतात, गृहकर्ज, वाहनकर्ज,वयक्तीक कर्ज , व्यवसायीक, शासकीय योजनातुन कर्जपुरवठा करण्याची मागणी बँका कडे करतात. तालुक्यातील बँका संबंधित ग्राहकांना नियमित कर्ज पुरवठा करत आहेत.मात्र येथील बँकेत काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इन्शुरन्स पाॅलीसीतुन कमीशन मिळवण्यासाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना पाॅलीसी घेण्याची सक्ती करत असल्याचा धंदाच सुरू केला आहे.काही अधीकरी कर्मचारी बँकेतील कामे सोडून आपल्या सोयीनुसार स्वतः अथवा नातलगांमार्फत पाॅलिसी एजन्ट बनले आहेत. कर्ज काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना हे अधीकारी कर्मचारी कर्ज मिळेल परंतु इन्शुरन्स पाॅलीसी घ्यावीच लागते असे सांगत आहेत.तसा प्रत्ययही कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना येत आहे.या पाॅलीसीतुन त्यांना रग्गड कमीशन देखील मिळत आहे.तर काही कर्जदारांकडून पॉलिसीची रक्कम कापूनच उर्वरित रक्कम दिल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे, मागील काही दिवसांपुर्वी एका ग्राहकाने येथिल बंॅकेतुन कर्ज काढले होते.त्याचा इन्शुरन्स क्लेम झाला.येथिल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या ग्राहकास क्लेम देताना मोठं प्रदर्शन करत धनादेश सुपूर्द केला.त्याने भरलेल्या पॉलीसीतून त्याला पाॅलिसीचा क्लेम मिळाला.त्याचे कमीशन संबंधित एजंटला मिळाले मात्र त्याला मिळालेल्या क्लेमचे बँक कर्मचाऱ्यांनी अक्षरशः भांडवल करून बँकेतुन काढलेली पाॅलीसी कशी सरस आहे हे दाखवण्याचे काम केले. बँक कर्मचारी आपल्या फायद्यासाठी सोंग करत असल्याची चर्चा पूर्णा शहरात रंगली आहे.
ज्या ग्राहकांना कर्ज हवे त्यांना इन्शुरन्स पाॅलीसी काढावी लागणार आहे.अन्यथा कर्ज मिळणार नाही असे चित्र पूर्णा शहर व तालुक्यात दिसत आहे.बॅकेच्या अधिकारी कर्मचारी यांचे कडून कर्ज मागणीसाठी आलेल्या ग्राहकांची विमा पाॅलीसीसाठी अडवणूक होत असल्याने बँकेचे ग्राहक अक्षरशः वैतागले अाहेत. यासंदर्भात बँकेच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन पूर्णा तालुक्यात कर्जदारांना विमा पाॅलीसीबाबत होत असलेली सक्ती बंद करावी.संबंधीत एजन्टची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
एसबीआयची स्वत:ची पॉलिसी
एसबीआयस्टॅण्डर्ड लाइफ इन्शुरन्स नावाने एसबीआयची स्वतंत्र पॉलिसी आहे. ग्राहकांना पाॅलीसीसाठी सक्ती करुन त्यांच्या हक्काच्या पैशांवरही डल्ला मारण्याचा हा नवीन फंडा सुरू करण्यात आला असल्याची भावना ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. पॉलिसीच्या आग्रहामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे काढले नाहीत. आणखी काही दिवस वाट बघून थेट आंदाेलन करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.
काही कर्मचारी वैतागले, बँकेत हुज्जत…
एसबीआयच्यापॉलिसी काढण्याच्या फंड्यापासून अनभिज्ञ असलेले ग्राहक बँकेत आल्यानंतर त्यांना काही विशिष्ट कर्मचाऱ्यांकडून पॉलिसी काढण्याची माहिती दिली जाते. पॉलिसीसाठी खात्यातून रक्कम कापून घेणार आहोत. तुम्ही आधार कार्ड इतर कागदपत्रे घेऊन या, असा सल्ला दिला जातो. हे एेकताच शेतकरी संतप्त होतात. त्यांचा यात प्रकरणात संबंध नसलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांशी नाहक वाद होतो. बँकांमध्ये हा प्रकार नित्याचाच झाला आहे. पॉलिसी काढण्याची सक्ती केली जात असल्यामुळे काही कर्मचारीही त्रासले आहेत.