महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीसाठी विशेष रेल्वे.!

Spread the love

नांदेड मार्गे धावणार दादर-आदिलाबाद-दादर एक्स्प्रेस

पूर्णा(प्रतिनिधी)

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भिमसैनिकांसाठी दमरेच्या नांदेड रेल्वे विभागातुन दादर-अदिलाबाद-दादर विशेष अनारक्षित रेल्वे चालवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
  महापरिनिर्वाण दिना निमित्त लाखों अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल होतात.मराठवाड्यात ही संख्या लक्षणीय आहे.ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नांदेड रेल्वे विभागातून (दादर-आदिलाबाद-दादर) विशेष मुदखेड,नांदेड, छत्रपती संभाजी नगर, मनमाड मार्गे कल्याण,ठाणे,मुंबई (दादर) गाडी क्र.०७०५८/५७एक विशेष अनारक्षित गाडी सोडण्यात येणार असल्याचे असल्याची माहिती नांदेड येथील रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली आहे.
गाडी क्र ०७०५८ आदिलाबाद येथून दिनांक ५ डिसेंबर  रोजी सकाळी ७ वाजता सुटेल, व नांदेड येथून सकाळी ११:१५ वाजता सुटेल, तर परभणी येथून दु.१२:३० वाजता, जालना येथून ,दुपारी ३:३२ वाजता औरंगाबाद येथून ४:५० वाजता सुटेल आणि पुढे मनमाड मार्गे दादर (मुंबई) येथे दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी ३:१० वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासात ०५०५७ हि गाडी दिनांक ७ डिसेंबर  रोजी रात्री १२:५० वाजता सुटून हि गाडी  , आणि मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे नांदेड येथे दुपारी १;२५ वाजता पोहोचेल. नांदेड येथून १;३० वाजता निघेल आणि आदिलाबाद येथे सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. या विशेष गाडीस १२ डब्बे असणार आहेत.

You cannot copy content of this page