Hindu March:पूर्णेत मंगळवारी विराट हिंदू मोर्चा
बांग्लादेशमध्ये हिंदू धर्मियांवर होणार्या अत्याचाराचा नोंदविला जाणार निषेध
सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचे आयोजन
पूर्णा/प्रतिनिधी
(Hindu March) : बांग्लादेशमध्ये हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या मंगळवार रोजी पूर्णा शहरात विराट हिंदू मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाच्या अनुषंगाने नुकतेच बैठकाही घेण्यात येत आहेत.
बांग्लादेशमध्ये (Bangladesh)हिंदू धर्मियांवर वेगवेगळे अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे या अत्याचाराचा निषेध नोंदविला जात आहे. (Hindu March) हिंदू धर्मियांवर भ्याड हल्ले(Attac), हत्या, बलात्कार आणि अमानवी छळ तसेच प्रसिद्ध इस्कॉन मंदिराचे प.पू. श्री स्वामी चिन्मय कृष्णदास महाराज यांना विनाकारण कारावासात डांबून ठेवण्यात आले आहे. बांग्लादेशमध्ये हिंदू धर्मियांवर अत्याचार अधिकच वाढत चालले आहे.त्यामुळे परभणी(Parbhani) पूर्णा
(Purna)जिल्ह्यातील सकल (Hindu March) हिंदू समाजाच्यावतीने १० डिसेंबर मंगळवार रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने सकाळी १० वाजता पूर्णेतील जुना मोंढ्यातील श्रीराम मंदिर येथून एकत्रिकरण होणार असून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक,कमाल टाॅकीज ते आनंदनगर चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या नियोजीत जागेपर्यत काढला जाणार आहे. याठिकाणी प्रबोधन केले जाणार आहे.यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पंतप्रधानांना निवेदन पाठविले जाणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला, पुरूष, युवक, युवती आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.