परभणीत पोलिस अलर्ट;आंदोलकांवर लाठीचार्ज ; तोडफोड जाळपोळ करणाऱ्यांची धरपकड परिस्थिती नियंत्रणात -आयजी शहाजी उमप

Spread the love

परभणी (प्रतिनिधी)
परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेचे पडसाद शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उमटले सर्वच तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.तर पराभणीत आंदोलकांनी दुकानांना लावली ,आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवले, दुचाकी जाळल्या,वाहनांची दुकानांची तोडफोड केली.जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली,शहरासह कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे फोडले,पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या,पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीमार,पराभणीत इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारींना काढले जमावबंदीचे (कर्फ्यु )आदेश काढले.पोलीसांनी आय.जी शाहजी उमप यांच्या नेतृत्वाखाली परिस्थिती आटोक्यात आणली असून तोडफोड, जाळपोळ करणाऱ्या ४० ते ५० जणांना ताब्यात घेतले आहे.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेच्या पुस्तकांची प्रतिकृती ठेवली आहे. मंगळवारी १० रोजी सायं ५ वाजेच्या सुमारास एका माथेफिरूने संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. जमावाने त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु या घटनेमुळे पराभणीत बुधवारी बंद पुकारण्यात आला. या बंदला हिंसक वळण लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांनी घुसून तोडफोड केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात येऊन बसले. जिल्हाधिकारींचे दलन ही आंदोलकांकडून फोडण्यात आले. यामुळे कर्मचारी घाबरले. ते जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठाण मांडून बसले.दरम्यान, पोलिसांकडून आंदोलकांवर पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सध्या परभणीत तणावपूर्ण शांतता आहे. परभणीत तणावाची स्थिती कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असून इंटरनेट सेवाही बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
परभणीत जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर इतर जिल्ह्यातून जालना मार्गे परभणी आणि जिंतूर जाणाऱ्या जवळपास १५ एसटी बस जालन्यातील मंठा येथील बसस्थानकावर थांबवल्या आहेत. जालन्यातील परतुर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या ७ बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. परभणीतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयजी शाहजी उमप शहरात दाखल झाले असून त्यांनी शहरात सर्वत्र फिरून परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी बोलताना ते म्हणाले की,परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर आज बंद पुकारला होता. आज बंद आणि जिल्हाधिकारींना निवेदन देणे असा कार्यक्रम आंदोलकांचा होता. परंतु निवेदन देण्यासाठी येताना काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. काही ठिकाणी टायर जाळले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आणि पुरुषांनी तोडफोड केली. जाळपोळ तोडफोड करणाऱ्या ४० ते ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे उमप यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page