परभणी;पोलीसांच्या ताब्यातील महिला दगावल्याची निव्वळ अफवाच
अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची माहिती
परभणी(प्रतिनिधी)
संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर परभणी शहरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची वार्ता परभणी शहरांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. पुन्हा शहरात हिंसाचार उसळेल या भीतीने शुक्रवारी 13 रोजी शहरात एकच गोंधळ उडाला होता. सुरू असलेली दुकाने पुन्हा बंद होत होती. या घटनेची बाबत सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून याबाबत सविस्तर माहिती घेतली असता अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिलेल्या माहिती नुसार असा कुठलाही प्रकार परभणी शहरांमध्ये घडलेला नाही. कोणत्याही महिलेचा मृत्यू झाला नाही त्यामुळे कोणीही अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक काळे यांनी केले आहे.
परभणी शहरात दि.१० डिसेंबर रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासमोर असलेले संविधान पुस्तिकेचे प्रतिकृती शिल्पाची एका माथेफिरुने तोडफोड केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर परभणी सह सबंध जिल्ह्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परभणी त जाळपोळ, दगडफेकीचे प्रकारे घडले होते प्रशासनाने या प्रकरणी जमाबंदी ही लागू केली होती. मात्र काही तसाच परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी गुरुवारी रात्री शांतता समितीची बैठक सर्वांना शांततेचे आवाहन करत आपापली व्यवहार सुरळीत करावी असे आवाहन केले होते. झालेला प्रकार मागे सारून आज शुक्रवारी १३ रोजी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चालू केली होती शहरांमध्ये रहदारी सुरू होती दरम्यान दुपारी एक अफवा वाऱ्यासारखी पसरली की, हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमाचे तर ते जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून कार्यालयात हजर असलेले अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारणा केली त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की. अशी कुठलीही घटना घडलेली नाही कोणीतरी खोटी अफवा पसरवत आहे त्यामुळे अशा खोट्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. पूर्णा शहरामध्ये पूर्ण क्षमतेने पोलीस बंदोबस्त तैनात आहे कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.