परभणी;जिल्हा कारागृहातील त्या तरुणाचा मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल
परभणी(प्रतिनिधी)
संविधान पुस्तीका प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना जिल्हा कारागृहात मृत्यू झाल्याची घटना रविवारी १५ रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले होते.घटनेनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी सुर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणी कारागृह अधीक्षकांच्या खबरीवरुन नालपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोर असलेल्या संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरण घडले होते.घटनेनंतर परभणी शहरात हिंसाचाराची घटना घडली होती. पोलीसांनी याप्रकरणी ४१ पुरुष व ९ महीला असे एकूण ५० जणं ताब्यात घेतले होते.दरम्यान हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी वय ३५ वर्ष
शंकर नगर उर्दू शाळेजवळ हा तरुणाचा देखील समावेश होता.याप्रकरणात त्याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.जिल्हा कारागृहात असताना रविवारी १५ रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास त्यास त्याच्या छातीमध्ये जळजळ व अस्वस्थ वाटू लागल्याने कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यास औषध उपचार करता जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सदर तरुणाचा E.C.G. काढला व तो तपासला असता वैद्यकिय अधिका-यांनी तो मरण पावल्याचे सांगितले.घटंनेची माहिती मिळताच परभणीचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तेलगावकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप,प्रभारी पो.अ.यशवंत काळे, नानलपेठ ठाण्याचे पो.नी.काकडे, स.पो.नी.किनगे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन सविस्तर माहिती घेतली. याप्रकरणी जिल्हा कारागृह अधीक्षक पी.आर.पाटील यांनी मयत सोमनाथ सुर्यवंशी यांचे मृत्यू प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात खबर दाखल केली आहे.प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तेलगावकर हे करत आहेत.
पून्हा तणावपूर्ण वातावरण
परभणी शहरातील हिंसाचार घटनेत जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युची बातमी परभणी शहरासह जिल्ह्यात वा-यासारखी पसरली.घटनेने सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.परभणी शहरातील बाजारपेठ बंद ठेवली होती.तर पूर्णा शहरात देखील याचे पडसाद उमटले असून शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली.