पूर्णा नदीकाठी आढळले अनोळखी ईसमाचे शव.
परिसरात एकच खळबळ;पोलीसात घटनेची नोंद
पूर्णा ( प्रतिनिधी)
शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा नदीपात्रालगतच्या स्मशानभूमीजवळ एका ३४ वर्षीय ईसमाचे शव आढळून आल्याची घटना सोमवारी २४ मार्च रोजी उघडकीस आली आहे.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून,याप्रकरणी पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेची नोंद करत मयत ईसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असल्याची प्रार्थमिक माहीती आहे. पूर्णा शहरालगत नदीकाठी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, लिंगायत स्मशानभूमी परिसरात अनेक विट भट्ट्या आहेत.यातील एका विट भट्टी जवळ गो-या वर्णाचा, लांब मिश्या,दाढी असलेला एक ३८ वर्षीय ईसम मृत अवस्थेत पडलेला असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहीले.काहींनी सदरील खबर तातडीने पोलीसांना कळवली .खबर समजताच पो.नि.विलास गोबाडे हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी सदर मृत अवस्थेत असलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्यास उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.सदरील ईसम हा नेमका कोण आहे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र नक्की समजू शकले नाही.