पहेलगाम घटनेच्या निषेधार्थ परभणी कडकडीत बंद…!

Spread the love

परभणी(प्रतिनिधी)

जम्मू काश्मीर मधील पहेलगाय येथे अतेरेक्यांनी विविध राज्यांतून आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढवून निष्पाप २६ जणांचा बळी घेतला.यानिषेधार्थ सकल हिंदू संघटनांकडून गुरुवार २४ एप्रिल रोजी परभणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याअनुषंगाने व्यापारी वर्गाने विशेषतः मुस्लिम बांधवांसह विविध संघटना, राजकीय पक्षांकडून जिल्ह्यात कडकडीत बंदला पाठिंबा देत ‌निषेध नोंदविण्यात आला.

जम्मू कश्मीर येथील पहेलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटक व यात्रेकरूंवर अमानुष पणे हल्ला चढवून गोळीबार केला. या हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार २४ एप्रिल रोजी परभणीत हिंदू संघटनांकडून जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.त्यानुसार हिंदू संघटनांकडून गुरुवारी बंद पाळण्यात आला होता. सकाळी १० वाजल्या पासून शहरातील व्यापारी, व्यवसायिकांनी आपली प्रतिष्ठाने व दुकाने तसेच वाहन चालकांनी आपली प्रवासी वाहने सेवा बंद ठेवून परभणी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र अत्यावश्यक सेवांना बंद मधुन वगळण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील, शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील शनिवार बाजार येथून सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायणचाळ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

पूर्णेत निषेध प्रशासनाला निवेदन देणार

कश्मीर येथील पहालगाम या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या बंधु भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण आज गुरुवारी २४ रोजी सायंकाळी ठिक ७ वा छत्रपती शिवाजी महाराज चौक पुर्णा येथे सकल हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे उपस्थित राहावे यावेळी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाज बांधव पुर्णा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page