जुगार्‍यांची हिम्मत वाढली;छापेमारी करणाऱ्या पोलीसांनाच मारहाण

Spread the love

परभणी जिल्ह्यातील वालुर येथील घटना,;जुगाराचे साहित्यही पळवले;गुन्हा दाखल

परभणी(प्रतिनिधी )

जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यावर पोलीसांची वचक कमी होत आहे की काय छापेमारी करणाऱ्या पोलीसांनाही अवैध धंदे वाले आता मारहाण करु लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालुर येथे २१ में रोजी सायं जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत जुगा-यांनी हुज्जत घालत त्यांना मारहाण करत जुगाराचे साहित्य घटनास्थळावरून लंपास केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात सदरील जुगार्‍ याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वालूर येथील बसस्थानक परिसरात तांबोळी यांच्या हॉटेलच्या बाजुला पत्राच्या दुकानात सेलू पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा घालून कारवाई केली. यावेळी रमेश कुपनवार यांच्याकडे जुगाराचे साहित्य व रोख मिळून आली. पोलीस कायदेशीर कारवाई करत असताना जुगारी ग्रामपंचायत सदस्य लिंबाजी कुपनवार, रघुनाथ पांढरे, रमेश कुपनवार, सलीम पठाण यांनी मिळून पोलीसां सोबत हुज्जत घालत शिवीगाळ करुन मारहाण करण्यात केली,या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केला.म्हणून रात्री उशीरा वालूर ग्रामपंचायत सदस्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page