पूर्णेतील होमिओपॅथिक डॉक्टरांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना निवेदन वाचा सविस्तर

Spread the love

सीसीएमपी होमिओपॅथीक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी प्रक्रिया राबवा;तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. पूर्णा ता.१६(प्रतिनिधी).

सीसीएमपी पास झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी राबविण्यात यावी अन्यथा संबंध होमिओपॅथिक डॉक्टर संपावर जाणार असल्याच्या निर्वाणीचा ईशारा देत आपल्या मागणीचे निवेदन पूर्णेतील होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

पूर्णा शहरासह तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयात बुधवारी (ता.१६)रोजी निदर्शने केली.यावेळी डॉ.गुलाब इंगोले डॉ. नागनाथ झुंजारे,डॉ.दिपक जोशी,डॉ.सुधीर जयस्वाल डॉ.मोहम्मद हिलाल,डॉ.संतोष गवळी,डॉ.प्रशांत कुलकर्णी,डॉ.साहेब भोसले,डॉ.सय्यद वहीद, डॉ.रिजवान खान डॉ.बालाजी घोरपडे, डॉ.प्रियंका कापसे,डॉ.उजमा सय्यद,डॉ. निकिता गंगासागरे,डॉ.श्रद्धा माइदळे आदींची उपस्थिती होती.यावेळी डाॅक्टरांनी तहसीलदार पूर्णा यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात आय.एम. एस संघटनेचे पदाधिकारी समाजमाध्यमांवर सी.सी.एम.पी कोर्स पास झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची दिशाभूल व बदनामी करणारी खोटी माहिती प्रसिद्ध करत जनतेसह सरकारची दिशाभूल करत आहेत. वस्तूची मात्र वेगळीच आहे.                      गावपातळीवर एमबीबीएस चे डॉक्टर पोहोचू शकत नाहीत. अशा भागातील नागरिकांना च वैद्यकीय सुवीधा मिळावी ह्या उद्देशाने एम.एस.सी अॅक्ट १९६५ व एमसीएच १९६० मध्ये बदल मंजूर करून १ जुलै २०२४ रोजी महामहीम राज्यपालांच्या स्वाक्षरीने कायद्यात बदल करून यास मंजूरी देण्यात आली आहे. यानंतर होमिओपॅथिक डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिनचा उपचार करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.असे असतानाही आय.एम.संघटनेच्या वतीने नाहक बदनामी सुरू केली आहे. तब्बल ९ हजार पेक्षा जास्त डॉक्टर सी.सी.एम.पी पास आहेत.शासनाने या डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी प्रक्रिया राबवावी ही मागणी निवेदनात केली आहे.तातडीने ही मागणी मान्य नाही झाल्यास होमिओपॅथिक डॉक्टर आपली दवाखाने बंद ठेवून बेमुदत संपावर जातील असा ईशाराही देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केला आहे.

You cannot copy content of this page