वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर आय. जींच्या विशेष पथकाने पकडले

Spread the love

चुडावा पोलीसांच्या हद्दीत अवैधंद्यावर दोन ठिकाणी छापेमारी;वाळूचा ट्रॅक्टर तसेच देशी दारू पकडली.

पूर्णा ता.१९(प्रतिनिधी);नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप यांनी अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी नियुक्त केलेल्या पथक क्र.४ ने शनिवारी ता.१९ रोजी पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीसांच्या हद्दीत दोन ठिकाणी छापेमारी करत वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरसह ट्राॅली तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यास ताब्यात घेत कारवाई केली आहे.दोन्ही कार्यवाहीत एकुण ३ लाख ५१ हजार रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.

परभणी,हिंगोली,नांदेड जिल्ह्यात बळावलेल्या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप यांनी चंग बांधला असून, त्यांनी कारवाई करता स्थापन केलेल्या पथकाने शेकडो कार्यवाही करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. पूर्णा तालुक्यात शनिवारी आय.जींचे पथक गस्तीवर होते.पथकास राज हाॅटेल कावलगांव फाटा येथे १ हजार २६० रुपये किंमतीची देशी दारू पकडून हाँटेल चालकावर गुन्हा दाखल केला आहे.तर सायं ६ वाजण्याच्या सुमारास रुंज पाटी येथून अवैधरित्या विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या MH-22 AM-6294 क्रमांकाच्या ट्रॅक्टरला पथकाने पकडून सदाशिव उत्तमराव डाखोरे, वय 32 वर्ष, रा. धानोरा मोत्या याचे विरोधात पोहेकाॅ. शेख शारेक यांच्या फिर्यादीवरून वाळूचोरीसह गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.दोन्ही ठिकाणच्या छापेमखरीत विशेष पथकाच्या पोलीसांनी १२६०/- रुपये किंमतीची देशी दारू तसेच ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा ट्रॅक्टर वाळुने भरलेली ट्राली असा एकूण ३ लाख ५० हजार मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाई पथक प्रमुख फौजदार श्रीमती डुकरे, पोहेकाॅ. शेख शारेक, पोहेकाॅ.गौतम ससाणे,पोहेकाॅ.जावेद, मपोशि श्रीमती जाधव आदींची उपस्थिती होती.

You cannot copy content of this page