विद्युत खांबाचा शाॅक लागुन २९ वर्षीय तरुणाचा मुत्यू
परभणी तालुक्यातील नांदगाव (बु) येथील घटना ताडकळस पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद
ताडकळस ता.२०(प्रतिनिधी)
ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव बुं येथील २९ वर्षाच्या तरुण हा मित्राला बोलत असताना विजेच्या खांबाला हात लावून मरण पावल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) रोजी घडली. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, परभणी तालुक्यातील नांदगाव बुं येथील मयत मोहन प्रकाश झाडें रा नांदगाव बुं ता जि परभणी हे शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नांदगाव बुं येथील मंदिरा जवळ मित्राला बोलत उभा असताना त्यांचा हात विजेच्या खांबाला लागला हातांचा स्पर्श झाल्याने धक्का लागुन मोहन झाडें मरण पावला. घटनेची
माहिती मिळताच ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार आप्पाराव व-हाडे, भगवान चोरघडे यांनी सरकारी दवाखान्या जाऊन पाहणी केली. रूग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून सदर युवक यत झाल्याचे सांगितले. मयताचे वडील प्रकाश मुंजाजी झाडे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा तपास ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आप्पाराव व-हाडे हे पुढील तपास करीत आहेत.