प्रहारचे चक्काजाम आंदोलन पूर्णेत सर्वपक्षीय बैठक संपन्न
परभणी ता.२०(प्रतिनिधी)
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी २४ जुलै रोजी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे.या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी ( ता.२०) रोजी बैठक घेण्यात आली.अशी माहिती प्रहारचे तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के यांनी दिली.
प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा मा.आ.बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दिव्यांग व निराधारांना सहा हजार रुपये मानधन, ग्रामपंचायत कर्मचार्यांना नियमित वेतन आदी प्रमुख मागण्यांसाठी सरकार विरोधात पदयात्रा सुरू केली आहे.गुरुवार २३ जुलै रोजी राज्यभर सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्याची हाक दिली असून, त्या अनुषंगाने पूर्णेत रविवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ता.२४ रोजी पूर्णा येथील नांदेड-पूर्णा मार्गावरील धनगर टाकळी फाट्यावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या बैठकीला मा.सभापती दिगंबरराव कऱ्हाळे रा.कॉ,ता आध्यक्ष आ.पवार, साहेबराव कल्याणकर राज्य.का.का सदस्य स्वराज्य पक्ष,मुंजाभाऊ कदम शहराध्यक्ष शिवसेना उ.बा.ठा, प्रल्हादराव पारवे ता.आध्यक्ष कॉग्रेस नरेश जोगदंड सामाजीक कार्यकर्ते,शिवहार सोनटक्के, ता. आध्यक्ष प्रहार जनशक्ती,विष्णू बोकारे प्रहार जन शक्ती सर्कल प्रमुख, अनिल बुचाले ता. आध्यक्ष मनसे, गणेश बुचाले ता आ.युवक स्वराज्य पक्ष मुंजाजी जोगदंड,मराठा समाज सेवक किशन सोलव, शाम सोनुले.बालाजी वैद्य, संचालक कृउत्पन्न बा समीती निखिल धामणगावे कॉंग्रेस, निळकंठ जोगदंड. . श्रीहरी इंगोले.संतोष जोगदंड.इत्यादी पूर्णा तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.