Robbers Attack on Farmer:दरोडेखोरांचा शेत आखाड्यावर हैदोस मारहाण दागिनेही लुटले
औंढा नागनाथ ता.२०/प्रतिनिधी
(Robbers Attack on Farm House) :शेत आखाड्यावर दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घालत येथिल शेतकऱ्यां-यासह त्यांच्या पत्नीस जबर मारहाण करत दाग दागिनेही लुबाडल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तांडा शिवारात ता.१९ जुनच्या मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेत दरोडे खोरांनी दोन महिलांच्या अंगावरील सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे दागिने लुटून नेले आहेत.याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांत विविध कलमांखाली अज्ञात चार दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तुकाराम महादू रणवीर, राजरत्न यशवंत रणवीर दोघे रा.रांजाळा ता.वसमत असं दरोडेखोराकडून मारहाण करण्यात आलेल्या जखमींचे नाव आहे. तुकाराम रणवीर हे मागील काही महिन्यांपासून शिरला तांडा शेत शिवार गट नंबर १८८ मध्ये शेतातील आखाड्यावर आपल्या कुटूंबियासह राहतात.शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ४ अज्ञात (Robbers Attack) दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावून आखाड्यावर प्रवेश केला.त्यांनी तुकाराम रणवीर यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यात कुर्हाडीच्या तुब्ब्याने मारहाण करून डोके फोडले. राजरत्न यशवंत रणवीर यांच्या डोक्यात लाकुड मारून डोके फोडल्यानंतर रंभाबाई तुकाराम रणवीर या वयोवृध्द महिलेला थापड बुक्याने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, नाकातील नथ, चांदीचे कडे, पाटल्या तसेच छाया राजरत्न रणवीर यांच्या गळ्यातील व कानातील चार ग्रॅमचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी काढून घेवून या सर्वांना घरात कोंडून टाकल्यानंतर आखाड्यावरून पलायन केले. त्यानंतर रणवीर कुटुंबियांनी या घटनेची माहिती ११२ वर दिल्यानंतर पोलिस निरीक्षक जी.एस. राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैâलास भगत, पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार दिलीप नाईक, संदिप टाक, रविकांत हरकाळ, इम्रान सिद्दीकी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून श्वान पथकाला तात्काळ पाचारण केले. परंतु श्वान पथकाने काही अंतरावरच माग काढून जागेवरच घुटमळला.या घटनेतील जखमी व्यक्तीना जवळा बाजार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांनी भेट देवून गुन्ह्याची माहिती घेतली. या प्रकरणात तुकाराम रणवीर यांनी औंढा नागनाथ पोलिसांत चार अज्ञात दरोडेखोरांनी जबर मारहाण करून सुमारे दिड लाख रुपये किंमतीचे दासीने ओरबाडून नेल्याची तक्रार दिली.यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि.के.डी. भगत हे करीत आहेत.