सोनेराव जाधव यांची फौजदारपदी पदोन्नती

Spread the love

पो.नि.विलास गोबाडे यांच्या हस्ते २ स्टार लाऊन सन्मान

पूर्णा(प्रतिनिधी)

येथिल पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत स.पो.उप.नि म्हणून कार्यरत असलेले सोनेराव देविदासराव‌ जाधव  श्रेणी फौजदार पदावर पदोन्नती मिळाली आहे.त्यांच्या पदोन्नती नंतर येथील पो.नि. विलास गोबाडे यांनी त्यांच्या खांद्यावर तीन स्टार लावून त्यांना गौरविले आहे.

   परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्हा पोलीस दलात आस्थापनेवर कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना, श्रेणी फौजदार पदावर नुकतीच पदोन्नती दिली आहे. यामध्ये पूर्णा पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेतील सपोउपनि सोनेराव जाधव वय ५५ वर्षे यांची वर्णी लागली आहे. त्यांनी १९९१ मध्ये परभणी जिल्हा पोलीस दलात सहभागी झाल्यानंतर नानलपेठ, मोंढा,बोरी,बासंबा, हिंगोली शहर, बामणीसह पूर्णा पोलीस ठाण्यात अशी एकूण ३५ वर्षं सेवा बजावली आहे.पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी त्यांच्या खांद्यावर दोन स्टार लावून त्यांचा गौरव केला.यावेळी सपोनि सोमेश्वर शिंदे,गजानन पाटील,फौजदार श्रीनिवास पडलवार,फौजदार आमेर चाऊस,विजय रणखांब,पवन लांडेवाड प्रल्हाद घोळवे,रमेश मुजमुले,संदिप चौरे,श्याम काळे,श्याम कुरील आदींनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page