“एमटीएस”(MTS) ऑलंपियाड”स्पर्धा परीक्षेत सिद्धी हिवरे सिल्व्हर मेडलसाठी पात्र

Spread the love

पूर्णा ता.२६(प्रतिनिधी)

“एमटीएस(MTS)ऑलंपियाड” महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन” स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन, यामध्ये पूर्णेतील विद्याप्रसारणी शाळेची विद्यार्थ्यांनी सिद्धी उर्फ सई गजानन हिवरे ईयत्ता ४ थी घवघवीत यश मिळवत राज्यातून ३२ व्या क्रमांकावर मजल मारीत सिल्व्हर मेडल मिळवलं आहे.

      राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये अध्ययन करणाऱ्या कुशाग्र बुद्धिच्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन प्राथमिक वर्गापासूनच त्यांच्या बुध्दीला चालना देण्याच्या उद्देशाने शासनमान्य असलेल्या”एमटीएस(MTS)ऑलंपियाड” महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन” राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा २०२४-२५ च्या  परीक्षा जानेवारी महिन्यात पार पडल्या होत्या.यात हजारों विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापरिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, यामध्ये विद्याप्रसारणी शाळेची विद्यार्थ्यांनी सिद्धी उर्फ सई गजानन हिवरे हिने परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.तीने परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावत राज्यात ३२ वा क्रमांक पटकावला आहे.ती सिल्व्हर मेडल प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम बक्षीसास पात्र ठरली आहे. तीच्या यशाबद्दल विद्या प्रसारणी शाळेचे अध्यक्ष डॉ. विनय वाघमारे, डॉ हरिभाऊ पाटील यांच्यासह मुख्याध्यापक देवीदास उमाटे  व शिवदर्शन हिंगणे, शिक्षक शिवप्रसाद ठाकुर, सज्जन जैस्वाल,प्रकाश रवंदळे, श्रीकांत कदम,पंकज कदम,घुले सर आदीं शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page