श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण समिती संपर्क कार्यालयाचे परळीत उदघाटन
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण समिती संपर्क कार्यालयाचे परळीत उदघाटन
यथाशक्ती देणगी अर्पण करून राममंदिर निर्माण कार्याचे साक्षीदार व्हा – श्री कांतामहाराज जोशी
जनजागृती करता साधु संतांनी मंदिर निर्माण कार्यात आपले योगदान द्यावे – ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री
परळी वैजनाथ(प्रतिनिधी) – संपूर्ण देशभरात होत असलेल्या श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियान समिती मार्फत अयोध्येत होणाऱ्या राममंदिरासाठी निधी संकलन अभियान राबविले जात आहे.परळी तालुक्यात हे अभियान आदर्शवत आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्या साठी आज शहरात संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.गाळा क्र.13 दिगंबर कॉम्प्लेक्स ,तळ परिसर वैद्यनाथ मंदिर रोड या ठिकाणी या कार्यालयाचे उदघाटन कांतादेव महाराज जोशी,ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री कांतामहाराज जोशी म्हणाले की प्रभू रामाचंद्राच्या कार्यात यथाशक्ती देणगी अर्पण करून राममंदिर निर्माण कार्याचे साक्षीदार व्हावे.अशी संधी आपल्याला पुन्हा कधीही येणार नाही म्हणून आपण सर्वांनी यात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.तर जनजागृती करत साधु संतांनी मंदिर निर्माण कार्यात आपले योगदान द्यावे असे उद्गार ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री यांनी काढले.याची देही याची डोळा याचा अनुभव आपल्याला मंदिर निर्माण कार्यात येणार आहे यामुळे तळागाळातील रामभक्तांनी निधी समर्पण अभियानात आपले योगदान द्यावे असे शास्त्री महाराज म्हणाले.
महिनाभर निधी संकलनासाठी तालुक्यातील विविध भागात अभियान राबवले जाणार आहे.मंगळवारी सायंकाळी 6 वा झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली.तालुक्यातील रामभक्तांनी राममंदिर निर्माण कार्यात स्वच्छेने योगदान देण्याचे आवाहन परळी वैजनाथ तालुका अभियान समिती तर्फे करण्यात आले आहे.यासाठी 9975934730 व 9975065598 या क्रमांकावर संपर्क करावा असे सांगितले आहे.