परभणी जिल्ह्यात पोलीस अधीका-यांच्या बदल्या…
परभणी जिल्ह्यात पोलीस अधीका-यांच्या बदल्या…
परभणी/प्रतिनिधी
जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी जिल्ह्यातील अधीकारी पोलीस अधीका-यांच्या वयक्तीक कारणांहुन, प्रशासकीय तसेच विनंतीवरून बुधवारी ता.२७ रोजी बदल्या केल्या असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.यानुसार पाथरी पोलीस ठाण्याचे पो.नि.गजानन सैदाने यांची वयक्तीक कारणांहुन पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस ठाण्यात,तर पुर्णेचे पो.नि.गोवर्धन भुमे यांची सेलु पोलिस स्थानकात,तर नियंत्रण कक्षातील पो.नि.वसंत चव्हाण यांची पाथरी पोलिस ठाण्यात तर सेलु पोलिस ठाण्याचे सहा.पो.नि. विजय रामोड यांची ताडकळस पोलीस ठाण्यात,आणी वाचक शाखेचे स.पो.नी चोरमले यांची पुर्णा पोलिस स्थानकात व नालपेठचे पोउनि.मंगेश नाईक यांची पुर्णेला बदली करण्यात आली आहे.