पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावर ट्रॅकटर चालकास अडवून ट्रॅक्टर पळवले..

Spread the love

पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावर ट्रॅकटर चालकास अडवून ट्रॅक्टर पळवले..
पूर्णा पोलीस ठाण्यात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल


पूर्णा/प्रतिनिधी
पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी फाटा परिसराल लक्ष्मीनगर कालव्याजवळ एका ट्रॅक्टर चालकास अडवून त्याचे हात-पाय बांधून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरचे हेड व मोबाईल पळवल्याची घटना आज रविवार दि.७ मार्च २०२१ रोजी मद्यरात्री १-०० ते १-३० वाजेच्या सुमारास घडल्यामुळे वाहन धारकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या वाटमारीच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपळगाव कूटे येथील रहिवासी गणेश पंडितराव लोंढे हे रविवारी पहाटे एक-दीडच्या सुमारास आहेरवाडी फाटा येथून लक्ष्मीनगरच्या पुढे असलेल्या कालव्या बाजूच्या वडाच्या चार झाडाजवळून जात होते. त्यावेळी अचानक तिघा व्यक्तीनी त्यांच्याजवळची होंडा मोटरसायकल ट्रॅक्टरसमोर आडवी लावली. व गणेश लोंढे यांना मारहाण करीत त्यांचे पाय मोठ्या पांढऱ्या रुमालाने लिंबाच्या झाडास बांधले. हात सुतळीने बांधून त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल व ट्रॅक्टरचे हेड क्र.एमएच.३८ व्ही ४५५३ त्या अज्ञात तीन भामट्यांनी पळवले. घटना घडल्यानंतर लोंढे यांनी तात्काळ पूर्णा पोलिसांना संपर्क केला. उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद खोडवे,पोलिस निरीक्षक बी.पी.चोरमले,सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाटमारी करणारांचा शोध घेतला,पण ते सापडले नाहीत.
गणेश लोंढे यांच्या तक्रारीवरुन पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी अचानक थांबून आपल्या ताब्यातील ट्रॅक्टरचे हेड व मोबाईल आपणास बांधून पळवून नेल्याचे म्हटले आहे. ज्याची किंमत पाच लाख पाच हजार रुपये एवढी होते, असेही फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे हे करीत आहेत….

You cannot copy content of this page