लॉकडाऊन मधील निर्बंध वगळून कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजनाबाबत प्रशासन कटिबद्ध – नम्रता चाटे
लॉकडाऊन मधील निर्बंध वगळून कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजनाबाबत प्रशासन कटिबद्ध – नम्रता चाटे
जनजागृतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांसह विविध खात्यातील अधिकारी उतरले रस्त्यावर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जिल्हयात २६ मार्च २०२१ पासून लागू असलेले लॉकडाऊन मधील निर्बंध वगळून कोरोना विषाणू ( कोविड-१९ )प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजनाबाबत दिशानिर्देश लागू करण्यात येत आले आहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी परळी वैजनाथच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे स्थानिक प्रशासनातील विविध प्रमुखांना सोबत घेऊन शहरात सर्वत्र फिरल्या.
यावेळी तहसीलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलदार बाबुराव रूपनर, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, गट विकास अधिकारी संजय केंद्रे, शहर पोलीस निरीक्षक हेमंत कदम, संभाजी नगर पोलीस ठाण्याचे सपोनि मरळ आदी अधिकारी वर्गाने शहरांत विविध भागांत फिरून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांनी पुढीलप्रमाणे आवाहन केले आहे.
प्रामुख्याने सर्वांनी अत्यावश्यक कारण असेल तरचं घराबाहेर पडावे. आणि, घराबाहेर पडताना तोंडावर मास्क घालणे बंधनकारक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी
१) मुखपट्टी / मास्कचा वापर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी त्याच प्रमाणे सार्वजनिक व खाजगी वाहनातून प्रवास करताना मुखपट्टी/ मास्क वापरणे बंधनकारक असेल.
२) सामाजिक अंतर राखणे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तीमध्ये किमान 6 फूटाचे अंतर राखणे बंधनकारक असेल. व्यापारी आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे बंधनकारक असेल आणि अशा आस्थापनांमध्ये एका वेळी पाच पेक्षा जास्ती ग्राहक / व्यक्ती असणार नाहीत.
३) सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास प्रतिबंध-सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या व्यक्ती विरुद्ध त्या त्या संबंधीत प्राधिकरणाने कायदे व नियम याद्वारे निश्चित केलेल्या दंडाची आकारणी करणेत यावी.
४) सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखू, सुपारी इ. खाण्यास / पिण्यास प्रतिबंध करणेत येत आहे.
५) खाजगी, शासकिय – निमशासकीय कार्यालये त्याचप्रमाणे व्यापारी – औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकतेप्रमाणे घरुन काम करणेची मुभा देणेत यावी, कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजार तसेच औद्योगिक आस्थापनांच्या कामाच्या वेळांमध्ये अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची गर्दी होणार नाही अशा पध्दतीने
विभागणी करावी.
६) सर्व आस्थापनांमध्ये येणारे कर्मचारी / ग्राहक यांच्येसाठी शरीराचे तापमान तपासणे, हात धूणे आणि सॅनिटायझरची सुविधा पुरवून सर्व येण्या आणि जाण्याच्या दारांमध्ये (प्रवेश व बहिर्गमन ) आणि सामुदायीक जागांच्या ठिकाणी या उपाययोजना ठेवाव्यात.
७) सर्व आस्थापनांमधील कामाची जागा, सामुदाईक वापराची ठिकाणी त्याच प्रमाणे व्यक्तींचा एकमेकांशी संपर्क येईल अशी ठिकाणे वारंवार निजतुक करणेत यावीत.
८) सर्व प्रकारच्या आस्थापनांमधील व्यवस्थापन तिथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल. दोन कामाच्या पाळ्यांमध्यो अंतर असेल व कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा भिन्न-भिन्न असतील याची दक्षता घेतील.
जे लोक कोविड19 ची नियमावली मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी नम्रता चाटे यांनी दिला.