पूर्णा ता.१ आॅगस्ट (प्रतिनिधी)
राज्य भरात कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायांविरुद्ध समाजबांधव एकवटले आहेत.पूर्णा शहरासह जिल्ह्यातील कुरेशी समाजाने राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले आहेत.मागील काही दिवसां पासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनवर शासनाने अद्याप कोणताही तोडगा काढला नसल्याने आता समाजाने सर्वत्र मुकमोर्चे काढले जात आहेत.पुर्णा शहरातील समाजबांधवांनी १ ऑगस्ट रोजी(Purna Qureshi community Silent March) भव्य मूक मोर्चा काढून शासनास आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवले आहे.
पूर्णा शहरात कुरेशी समाजाच्या वतीने शुक्रवारी मुकमोर्चा काढुन शासनास निवेदन देत आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यसपीठावर रिपाई नेते प्रकाश कांबळे, मा.नगराध्यक्ष हाजी कुरेशी व जाकीर कुरेशी, गटनेते उत्तम खंदारे, नगरसेवक अँड.हर्षवर्धन गायकवाड, वंचितचे दादाराव पंडित,सुनिल मगरे, नागेश एंगडे,अब्दुल मुजीब,शेख खददुस,आयुब कुरेशी,जाकीर मौलाना,अखिल अहेमद,अतिक भाई, सलीम सौदागर,बाबा पठाण सह आदींची उपस्थिती होती.यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन रौफ कुरेशी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठी कुरेशी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.दरम्यान समाज बांधवांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार बोथीकर,पो.नि.विलास गोबाडे यांच्या हस्ते शासन दरबारी पाठवण्यात आले.