पूर्णा-ताडकळस रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले
हटकरवाडी शिवारातील घटना;२४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू;चालक वाहनांसह पसार;पूर्णा पोलिस ठाण्यात नोंद
पूर्णा/प्रतिनिधी३० जानेवारी
तालुक्यातून पूर्णा ते ताडकळस महामार्ग क्र.६१ वरील मौजे हटकरवाडी पाटी जवळ दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २९ रोजी रात्री घडल्याचे उघडकीस आले आहे.सदरील दुचाकीस्वाराला अज्ञात वाहन चालकाने चिरडवून घटनास्थळावरून पोबारा केला असून,.घटनेप्रकरणी पूर्णा पोलीसांनी घटनेची नोंद केली असल्याची माहिती आहे.
अमोल किशन शिंदे वय २४ वर्ष रा.धानोरा काळे ता.पूर्णा जि.परभणी असं अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबतीत अधिक माहिती अशी की,अमोल हा बुधवारी दुपारी आपली दुचाकी घेऊन काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता.काम आटोपून गावी धानोरा काळे कडे पूर्णा-ताडकळस रस्त्यावरील हाटकरवाडी जवळ रात्री ९ ते १० दरम्यान त्याच्या दुचाकीला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.घटनेत त्याची चकनाचुर झाली असून, त्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना मिळताच पो.नि.विलास घोबाडे, बिट जमादार रमेश मुजमुले,चापोशि.शेंबेवाड, पो.काॅ. शैलेश टाकरस आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मयत अमोल शिंदेचा मृतदेह व क्षतीग्रस्त दुचाकी ताब्यात घेऊन पंचनामा करत त्यास ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले असून घटनेची नोंद पूर्णा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो.नि.विलास घोबाडे हे करत आहेत.