श्रीक्षेत्र सजगीर महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन
सुप्रसिद्ध भाजीच्या महाप्रसादाचे मुख्य आकर्षण;पालखी सोहळ्यासह आठ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; निकाली कुस्त्यांची दंगल
पूर्णा/ प्रतिनिधी
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पूर्णा तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथील सजगीर महाराज,रामगीर महाराज देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन महंत आशिषानंद महाराज,नारायणगीर महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, यात्रेनिमित्त दि.२ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् संगीत भागवत कथा,हरी जागर,पालखी सोहळा तसेच भव्य भाजीच्या महाप्रसादासह निकाली कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सजगीर महाराज देवस्थान समीतीच्या वतीने देण्यात आली.
पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र आहेरवाडी येथे मागील अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या सजगीर महाराज,रामगीर, महाराज,हिरागीर महाराज यात्रा महोत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. सकल ग्रामस्थांनी यात्रेची मोठी जय्यत तयारी केली आहे.दि.२ ते ९ एप्रिल दरम्यान दैनंदिन पहाटे ५;४५ वाजता महाआरती,सकाळी ६:३० वा.ज्ञानेश्वरी पारायण , दुपारी १ वाजता भागवत कथा,भागवतकार हभप.रुपालीदिदी सवने परतुरकर, यांच्या सुश्राव्य वाणीतून निरुपण होणार आहे.तर दररोज रात्री ८ वाजता दैनिक किर्तन महोत्सवतात दि.२ रोजी हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर, दि.३ हभप.सोपान महाराज मोरे,दि.४ हभप., माउली महाराज आळंदीकर, दि.५ रोजी हभप.शिवाजी महाराज देशमुख,हदि.६ रोजी हभप.माऊली महाराज जेहुरकर ्ये,दि.७ रोजी हभप.रामप्रसाद महाराज खैरे,दि.८ रोजी हभप.सुरदास महाराज रायवाडीकर,दि.९ रोजी हभप.रामकृष्ण महाराज लोहगावकर ,दि.९ रोजी भागवत कथेची सांगता ,सायंकाळी श्रींचा भव्य पालखी सोहळा, रात्री जागरण गोंधळ दि.१० रोजी .पालखी सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दि.१० रोजी सकाळी ९ ते ३ पर्यंत निकाली भव्य कुस्त्यांच्या दंगल यानंतर दुपारी ४ नंतर सुप्रसिद्ध भाजीच्या महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाच्या कार्यक्रमाचा भाविकांनी घ्यावा असे आवाहन मार्गदर्शक अशिषानंद महाराज, नेतृत्व नारायण महाराज व समस्त गावकरी मंडळी आहेरवाडी यांनी केले आहे.