अजितदादा पवारांनी धावता ताफा थांबवून दिली कार्यकर्त्यांना भेट..
पूर्णा (प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा नामदार अजितदादा पवार यांनी नांदेड ते परभणी दरम्यान जात असताना आपल्या धावत्या वाहनांचा ताफा थांबवून येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांना भेट देऊन चर्चा केली.
अजितदादा पवार हे शनिवार तारीख २६ एप्रिल रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी नांदेड येथे श्री गुरुगोविंद सिंग विमानतळावर आगमन झाल्यानंतर ती दादांचा ताफा परभणीच्या दिशेने झेपावला. नांदेड पूर्णा ते शिंगणापूर मार्गे यासाठी जात असताना पूर्ण शहरातील ताडकळस टी पॉईंट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रताप भैया कदम, तालुकाध्यक्ष दिगंबर कराळे, संतोष सातपुते, बाबा पठाण,कृष्णा कदम, राजू सेन, राजू कदम, आकाश गोडबोले, आधी शेकडो कार्यकर्ते स्वागतासाठी थांबले होते. अजित दादाचा धावता ताफा दाखल होताच त्यांनी कार्यकर्त्यांना पाहून चालकाला वाहन थांबवण्यात सांगितले. दादांनी यावेळी देशातील पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्याकडून कोणताही सत्कार स्वीकारला नाही. त्यांनी दहा मिनिटे पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप भैया कदम, तालुकाध्यक्ष दिगंबर कराळे यांच्याशी पक्ष कर्याचा आढावा घेतला तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले. यानंतर दादाचा ताफा नरसिंह पोखरणीकडे रवाना झाला. धावत्या शेड्युलमध्येही दादांनी कार्यकर्त्यांना वेळात वेळ काढून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले यावेळी पूर्ण पोलिसांकाचे पोलीस निरीक्षक विलास गोवाडे यांच्या नेतृत्वाखाली चौक बंदोबस्त तैनात होता.