शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून समृद्धी महामार्गाच्या कामाची पहाणी
पूर्णा( प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांनी पूर्णा तालुक्यातील गौर शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली.
महसूल विभाग व संबंधित कंत्राट कंपनीच्या अधिकाऱ्यांना शासकीय नियमांना फाटा देऊन होत असलेल्या गौण खनिज उत्खनाबाबत विचारना करीत माहीती घेतली.त्यांच्या कडे या कामासाठी गौण खनिज उत्खनन बाबत तक्रारी आल्याने ते नांदेड येथून परभणीला जात असताना त्यांनी सदरील ठिकाणी अचानक भेट दिली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी तहसीलदार माधवराव बोथिकर तलाठी गणेश गोरे सह माॅन्टो कार्लो कंपनीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.











