पूर्णेत गुरुवारी सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा निवड चाचणीचे आयोजन;क्रिडा प्रशिक्षक सज्जन जैस्वाल यांची माहिती

Spread the love

पुर्णा(प्रतिनिधी)


परभणी जिल्हा अॅथलेटिक्स असो व हौशी लंगडी असोसिएशन परभणीच्या वतीने क्रिडा तज्ञ माधव शेजुळ, रणजित काकडे, गुरुदास लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णा शहरात १४ वर्ष वयोगटा खालील मुले मुली यांची मैदानी स्पर्धांसाठी निवड करण्यासाठी येथिल संत तुकाराम महाराज मंदिर समोरील मैदानावर येत्या गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी निवड चाचणी घेण्यात येणार असून या निवड चाचणीत खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सज्जन जैस्वाल यांनी केले आहे.
      परभणी जिल्हा सब जूनियर अथलेटिक्स असो.व हौशी लंगडी असोसिएशनच्या वतीने १४ वर्ष वयोगटाखालील खेळाडूंसाठी घेण्यात येणा-या निवड चाचणीत खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला, शाळेतील बोनाफाईट ,आधार कार्ड आदीं दाखले घेऊन नोंद करणे आवश्यक आहे. या स्पर्धेत धावणे, उडी मारणे, फेकने थोईग, व रिले या प्रकारामध्ये खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी पन्नास रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येईल. ज्या खेळाडूंची खेळासाठी निवड करण्यात येईल त्यांना राज्य संघटनाच्या नियमाप्रमाणे नोंदणी शुल्क भरावे लागेल. जिल्हा स्पर्धेत प्रथम. द्वितीय. तृतीय. क्रमांक पटकीणाऱ्या खेळाडूची राज्यसंघटनेच्या पात्रता निकषाप्रमाणे राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. निवड चाचणी भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी सज्जन जयस्वाल, सुमित माने, संग्रामसिग ठाकुर, कैलास टेहरे, संजय कदम यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले.

You cannot copy content of this page