छत्रपती शिवरायांचे चित्र असलेले ATM चे वाटप सुरू

Spread the love

पूर्णेतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मिळत आहेत कार्ड

पुर्णा(प्रतिनिधी)

शासनाने जाहीर केलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थी महीलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले ‘रूपे कार्ड(’ATM कार्ड )देण्यासाठी तयार झाले असून, पूर्णा तालुक्यातील महीला खातेदारांसाठी महाराष्ट्र बँकेच्या शाखेत तब्बल ४ हजार ‘रुपे कार्ड'(ATM) उपलब्ध झाले असून,त्याचे वाटपही सुरू करण्यात आले असल्याची माहिती बँकेचे शाखाधिकारी चंद्रकांत कच्छवे यांनी दिली आहे.

जागतिक महिला दिनी राजभवनात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महीला व बालकल्याण मंत्री अदीती तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर,महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाणकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थी महीलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले ‘रूपे कार्ड(’ATM कार्ड )चे अनावरण करण्यात आले होते.या नंतर शासनाकडून राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखांमध्ये शिवरायांची प्रतिमा असलेले एटीएम कार्ड दाखल झाले आहेत.

पूर्णा तालुक्यातील लाडक्या बहीणीं साठी तब्बल ४ हजार रुपे कार्ड (ATM) दाखल झाले असून,शहरातील महाविर नगरातील सौ.आशा सुशिल गायकवाड यांना कार्ड देऊन गौरविण्यात आले.अन्य खातेदार महीलांनाही कार्डचे वाटप सुरू करण्यात आले असून बँकेत येऊन कार्ड घेऊन जावे असे शाखा अधिकारी कच्छवे यांनी सांगितले आहे. गुलाबी रंगाच्या या कार्डवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले असुन,त्याच्या कव्हरवर शिवप्रतिमेसह लाडकी बहिण योजनेचा उल्लेख केले‌ला आहे.त्या सोबतच या कार्डमध्ये मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट एक्सेस त्यात उपलब्ध आहे. याद्वारे डिजिटल सुरक्षितता आणि इन्शुरन्स सुद्धा मिळणार आहे. तसेच पेमेंट करण्यासाठी क्युआर कोडही देण्यात आला आहे. या कार्डचे यावेळी अनावरण करण्यात आले. देशात ‘रूपे कार्ड’ देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.शिवप्रेमी महीला मोठ्या उत्साहाने हे कार्ड घेण्यासाठी बँकेत गर्दी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

You cannot copy content of this page