हृदयद्रावक; बंगळूर एक्स्प्रेसने एकाचवेळी अनेकांना चिरडले

Spread the love

जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळील घटना;५ ते ६ जणांचा जागीच मृत्यू; अनेकजणं गंभीर जखमी धावत्या रेल्वेच्या बोगीला आग लागल्याची उडाली होती अफवा

जळगाव( प्रतिनिधी)
जळगाव हृदयाच्या थरकाप उडवणारी दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.धावत्या रेल्वेच्या बोगीला आग लागल्याच्या अफवेने जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. ही घटना जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ ही दुर्घटना घडल्याची माहिती २२ रोजी मिळत आहे.या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये ५ ते ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर काही प्रवाशी हे गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळी अत्यंत भयानक दृश्य असून काही जणांचे दोन तुकडे झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धुर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडले. परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या.
त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. त्यामुळे 35 ते 40 प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या. समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून बंगळुरू एक्सप्रेस आल्याने बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाकडून माहिती मिळाली आहे, पाचोरा रेल्वे स्थानकापासून जवळ ही घटना घडली. पुष्कर एकस्प्रेस जागेवर उभी होती. बोगीतून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यात सात ते आठ जण जखमी झाले आहे. तर काही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ४ .२० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी एक रुग्णवाहिका हजर आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे. या घटनेमुळे मुंबई आणि भुसावळकडे जाणाऱ्या काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे

You cannot copy content of this page