बीड जिल्हात मंगळवारी शाळा,महाविद्यालयांना सुट्टी-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

Spread the love

बीड,ता.१५(प्रतिनिधी)-Beed Collector Diclerd Holiday News बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक गावांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपत्कालीन निर्णय घेत मंगळवार, दि. १६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्याल यांना सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत अतिवृष्टी कायम राहण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी पूरग्रस्त भागात अनावश्यक हालचाल टाळावी, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्दे :

• बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर

• नद्या-नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहत

• आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारींचा निर्णय

• मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी

You cannot copy content of this page