बीड हादरले धारधार शस्त्राने वाऱ करत युवकचा खून
बीड हादरले धारधार शस्त्राने वाऱ करत युवकचा खून
बीड –
शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात एका
युवकाचा धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात
आला. यश ढाका असे मृत तरुणाचे नाव आहे. पत्रकार
देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा आहे.
माने कॉम्प्लेक्स भागात असलेल्या पान टपरी समोर
रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास काही
तरुणांनी यश ढाका या युवकांवर प्राणघातक हल्ला
केला. धारदार शस्त्राचे वार झाल्याने यश जागीच
कोसळला.घटनेची माहिती मिळताच पोलीस
घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणातील एका
आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली
आहे. खून कोणत्या कारणावरून झाला याबाबत माहिती
अद्याप मिळू शकलेली नाही.
प्रथमदर्शनी प्राप्त माहिती….
यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंगचे) शिक्षण घेत
होता. वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा
प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.गुरूवारी रात्री
शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात हा खून
झाला असल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर
प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांचा गुन्हेगारावर
वचक राहिला नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट झाला आहे
. दरम्यान या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी
पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला
होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या अर्ध्या
तासात सुरज आप्पासाहेब काटे वय वर्ष, रा. बीड या
आरोपीला बेड्या ठोकून शिवाजीनगर पोलिसांच्या
स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी
बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या
मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक दुबाले, राहुल शिंदे
आणि मनोज परजणे यांनी केली.