बीड जिल्ह्यात आज पुन्हा रुग्ण वाढीचा उच्यांक: 711
बीड
बीड जिल्ह्यात आज पुन्हा रुग्ण वाढीचा उच्यांक: 711 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 158,बीड 189,आष्टी 102
बीड जिल्ह्यात आज पुन्हा रुग्ण वाढीचा उच्यांक: 711 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 158
बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5899 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 711 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5188 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 158 आष्टी 102 बीड 189 धारूर 11 गेवराई 54 केज 45 माजलगाव 56 परळी 44 पाटोदा 22 शिरूर 16 वडवणी 14
काल दि 7 रोजी 292 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले त्यांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला तर दुर्दैवाने 10 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे,
राज्यात करोनाने गाठला नवा उच्चांक;आज ५९ हजारांवर नवे रुग्ण
मुंबई: राज्यात करोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. रुग्णसंख्येचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असून २४ तासांत तब्बल ५९ हजार ९०७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. हा आजवरचा उच्चांक ठरला आहे. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येने आज पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
राज्यात आज ३२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७९ टक्के एवढा आहे. आज ५९ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३० हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २६ लाख १३ हजार ६२७ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ८२.३६ टक्के एवढे आहे