बीड जिल्ह्यात सकाळी 7 ते 11 किराणा भाजीपाला साठी परवानगी

Spread the love

बीड जिल्ह्यात सकाळी 7 ते 11 किराणा भाजीपाला साठी परवानगी

ज्याअर्थी, जिल्ह्यातील कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.
ज्याअर्थी, मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचेकडील दि.३०.०५.२०२१ रोजीच्या संदर्भ क्र.१८ च्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील भरलेले ऑक्सिजन बेड्स ची संख्या ४०% पेक्षा जास्त असल्याने सदर आदेशामधील
परिच्छेद इ (E) मधील तरतुदी बीड जिल्ह्याला लागु होतात.
त्याअर्थी, मी रविंद्र जगताप, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड मला प्राप्त
अधिकारानुसार तसेच फौजदारी प्रक्रीया संहीता १९७३ चे कलम १४४ अन्वये मेला प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून कोविड- १९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता दिनांक ०१.०६.२०२९ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून ते १५.०६.२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत

१. दिनांक ०१.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वाजेपासून ते १५.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० या दरम्यान केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील

सर्व औषधालये (Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स,
फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे
डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसीचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल
युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत
मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत.
२. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
३. दि.०१.०६.२०२१ ते १५.०६.२०२१ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना
(किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी संबंधित इ.) केवळ सकाळी ०७.००
ते सकाळी ११.०० या वेळेत चालू राहतील व शनिवार, रविवार पुर्णपणे बंद राहतील.
४. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील.
५. जिल्ह्यातील सर्व बँक/ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज दि.३१.०५.२०२१ पासून शासनाच्या नियमीत वेळेप्रमाणे
पूर्णवेळ सूरु राहतील.
६. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे २५% उपस्थितीत सुरु राहतील. (ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक
असेल.)
७. लसीकरणा करीता ४५ वर्षावरील ज्या व्यक्तींना मेसेज आला आहे /आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच
लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल. (लसीकरणासाठी आलेला मेसेज/आरोग्य विभागाचे पत्र, आधार कार्ड
सोबत असणे आवश्यक असेल.)
८. कृषी व्यवसायाशी संबंधित बि-बियाणे, खते, औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बि-बियाणे, खते,
औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल. तसेच कृषि विक्रेत्यांना/शेतकऱ्यांना बि-
बियाणे, खते, औषधे विक्रीस/खरेदीस पूर्णवेळ सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत परवानगी असेल.
(शनिवार व रविवार सुध्दा विहीत वेळेत चालु राहतील.)
९. कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० या वेळेतच सुरु राहतील.
१०. नरेगाची कामे सुरु राहतील. त्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर चा व कोविड -१९ विषयक जे नियम
आहेत ते पाळणे बंधनकारक असेल.
११. जिल्ह्यातील स्वस धान्य दुकानदार यांना सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण
करण्यास मुभा राहील. (राशनसाठी जाणा-या व्यक्तींच्या सोबत राशनकार्ड, आधार कार्ड असणे आवश्यक आहे.)
१२. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील.
१३. दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतूकीवर निर्बंध असणार नाहीत, परंतु दुकानांना ठरवून दिलेल्या
वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमाचा भंग केल्यास सदर दुकान कोरोना साथ अधिसूचना
जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल व दिनांक १२.०५.२०२१ च्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे दंड
आकारण्यात येईल.
सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागाची राहील.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम
१८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात
येईल. सदर आदेशाचा अंमल दिनांक ३१/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० पासुन राहील.सदरचे आदेश दिनांक ३१/०५/२०२१ रोजी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत

You cannot copy content of this page