हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता 18 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार

Spread the love

हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता 18 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार

ना. धनंजय मुंडे, आ. संजय दौंड यांचा यशस्वी पाठपुरावा

बीड (दि. 08) —- : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, आ. संजय दौंड यांनी राज्य सरकारच्या पणन विभागाकडे केलेल्या मागणीनुसार आता हरभरा खरेदीसाठी आधारभूत केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 18 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यात शासकीय आधारभूत केंद्रांमार्फत हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया 25 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली होती. ही प्रक्रिया 25मे पर्यंत सुरू होती,मात्र लॉकडाऊन मुळे अनेक शेतकरी आपल्याकडील हरभऱ्याची नोंदणी करू शकले नाहीत, त्यामुळे ना. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार आता 18 जून पर्यंत नोंदणीसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.

हरभरा उत्पादक शेतकरी ज्या तालुक्यातील आहेत, त्यांना त्याच तालुक्यातील केंद्रांवर नोंदणी करता येईल; आधार कार्ड, हरभरा पेरा नोंद असलेला 7/12, मोबाईल क्रमांक आदी आवश्यक बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करून विहित वेळेत नोंदणी व अन्य प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page