अखेर बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल, 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन…
बीड : दररोज तीनशे ते अडीचशे रुग्ण वाढत असल्याने आज अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. 26 मार्चच्या रात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी 10 दिवसाचे लॉकडाऊन केले. 26 मार्चच्या मध्यरात्री पासून 4 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन असणार आहे या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ए राजा जिल्हा परिषदेचे अजित कुंभार हे उपस्थित होते. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
१. सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे / मोकळ्या जागा , उद्याने , बगीचे हे संपुर्णतः बंद राहतील . तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning Walk व Evening Walk प्रतिबंधीत राहील . २. उपहारगृह , सर्व अनुज्ञप्त्या , रेस्टॉरंट , लॉज , हॉटेल्स , मॉल , बाजार , मार्केट संपूर्णत बंद राहतील . ( कोविड संक्रमित रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी जेवण , नाष्टा , चहा व इतर पुरवठा करण्यासाठी पुर्व परवानगी दिलेले वगळून ) ३. सर्व केशकर्तनालय / सलुन / ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील . ४. शाळा , महाविद्यालय , शैक्षणिक संस्था , प्रशिक्षण संस्था , सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील . सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी , तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद राहतील . तथापि अत्यावश्यक सेवेतील वाहने , पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकिय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील . सोबत ओळखपत्र / पुर्व परवानगी / वैद्यकिय कारण असेल तर त्यासंबंधीचा पुरावा . सार्वजनिक व खाजगी बस सेवा , ट्रक , टेम्पो , ट्रेलर ट्रॅक्टर इत्यादींसाठी संपूर्णतः बंद राहतील . ५तथापि कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे बीड जिल्ह्यातील नगरपालिका / नगरपंचायत चे पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत . तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी पुर्व परवानगी असलेले घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात तसेच किराणा ठोक व किरकोळ व्यापारी यांना 7 ते 9 या वेळात आपली आस्थापने सामाजिक अंतर व नियमांचे पालन करून उघडण्यास मुभा.












