जिल्ह्याचे लॉकडाऊन अखेर उठले जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, राज्यात लागू असलेले नियम मात्र जिल्ह्यात लागू राहणार

Spread the love

जिल्ह्याचे लॉकडाऊन अखेर उठले
जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, राज्यात लागू असलेले नियम मात्र जिल्ह्यात लागू राहणार

बीड/प्रतिनिधी
आज दि 14 मार्च 2020 अन्वये कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्तीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.

ज्याअर्थी, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडिल

आदेश दि.29 अन्वये जिल्ह्यातील परिस्थिती प्रमाणे संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढणेबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत. ज्याअर्थी, कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मा.

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा केलेली असून त्याबाचत मिशन बिगिन अगेन

अंतर्गत उपरोक्त वाचा क्र.6 अन्वये आदेश निर्गमीत केलेले आहेत. आणि ज्याअर्थी, वाचा क्र. 6 च्या आदेशान्वये राज्यात कोविड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेने कोविड-19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि तातडीने काही उपाययोजना करण्यासाठी काही सूचनांचे काटेकोर पालन करणेबाबत निर्देशित केले आहे.

त्याअर्थी राज्य शासनाकडील वाचा क्र. 6 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार व या कार्यालयाचे दिनांक 24.03.2021 रोजीचे आदेशातील दि.26.03.2021 ते दि.04.04.2021 या कालावधीतील लॉकडाऊन बाबत लागू करण्यात आलेले निबंध खालील नमूद केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग असलेले निबंध कायम ठेवून मागे घेणे आवश्यक असल्याने या आदेशाद्वारे सदरील निबंध मागे घेण्यात येत आहेत परंतू खालील निर्बध दिनांक 15/04/2021 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू करीत आहे. तसेच, बीड जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत

आहेत :-

अ) कोविड -19 संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना.

१) मुखपट्टी / मास्कचा वापर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी त्याच प्रमाणे सार्वजनिक व खाजगी वाहनातून प्रवास करताना मुखपड़ी / मास्क वापरणे बंधनकारक असेल.

२) सामाजिक अंतर राखणे – नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तीमध्ये किमान 6 फूटाचे अंतर राखणे

बंधनकारक असेल. व्यापारी आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे

बंधनकारक असेल आणि अशा आस्थापनांमध्ये एका वेळी पाच पेक्षा जास्ती ग्राहक व्यक्ती असणार नाहीत.

३) सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध-सार्वजनिक ठिकाणी चुंकणाच्या व्यक्ता विरुध्द त्या त्या संबंधोल प्राधिकरणाने कायदे

४) सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखू, सुपारी इ. खाण्यास / पिण्यास प्रतिबंध करणेत येत आहे.

व नियम याद्वारे निश्चित केलेल्या दंडाची आकारणी करणेत यावी.

५) खाजगी । शासकिय / निमशासकीय कार्यालये त्याचप्रमाणे व्यापारी । औद्योगिक आस्थापनामध्ये काम करणा-्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकते प्रमाणे घरुन काम करणेची मुभा देणेत यावी, कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजार तसेच ओद्योगिक आस्थापनांच्या कामाच्या वेळामध्ये अशा ठिकाणी काम करणान्या लोकांची गर्दी होणार नाही अशा पध्दतीने विभागणी करावी.

६) सर्व आस्थापनांमध्ये येणारे कर्मचारी / ग्राहक यांचेसाठी शरिराचे तापमान तपासणे, हात धूणे आणि सनिटायझरची सुविधा सर्व प्रवेश, बर्हिगमन दारात व सामुदायीक जागांच्या ठिकाणी ठेवावी

७) सर्व आस्थापनांमधील कामाची जागा, सामुदाईक वापराची ठिकाणे त्याच प्रमाणे व्यक्तींचा एकमेकांशी संपर्क येईल अशी

ठिकाणे वारंवार निर्जतुक करणेत यावीत.

८) सर्व प्रकारच्या आस्थापनांमधील व्यवस्थापन तिथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल, दोन

कामाच्या पाळ्यांमध्ये अंतर असेल व कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा भिन्न- भिन्न असतील याची दक्षता घेतील. ब) उपरोक्त वाचा क्र. 6 प्रमाणे खालील प्रतिबंधात्मक उपाय योजना व निबंध दि.15.04.2021 चे मध्यरात्री 24.00 वा पर्यंत लागू राहतील –

1) कंटेन्टमेट झोन – प्रतिबंधित क्षेत्र. i) स्थानिक प्रशासनाने घोषित केलेली प्रतिबंधीत क्षेत्रे पुढील आदेशा पर्यंत कायम राहतील.

राहतील.

ii) केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी कंटेन्टमेंट झोन तयार करणेविषयी दिलेल्या सर्व सूचना या पुढील आदेशापर्यंत कायम

राहून सुरू राहतील. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या कार्यालय प्रमुखाने कर्मचारी उपस्थितीबाबत कोविड-19 प्रादुर्भाव व्यवस्थापनाच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घ्यावा. सर्व उत्पादन करणाऱ्या आस्थापना पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतोल. परंतु अशा आस्थापनांनी प्रत्यक्ष उत्पादनात काम करणाऱ्या कर्मचा-यांमध्ये सामाजिक अंतर राखले जाण्यासाठी आवश्यकते प्रमाणे कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी ठेवणेबाबत सुचित करणेत येत आहे. वस्तूंचे उत्पादन करणाच्या घटकातील कर्मचान्यांमध्ये

सामाजिक अंतर राखणेसाठी स्थानिक प्राधिकरणाने मान्यता दिल्या प्रमाणे अशा घटकांना कामांच्या पाळ्या वाढविण्याची मुभा असेल, अशी उत्पादन क्षेत्रे खालील बंधनांचे पालन करुन सुरु राहतील.

I) मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. (NO Mask – No Entry)

II) सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही

व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.

III) प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हंड सॅनिटायझर ठेवणेत यावीत. IV) सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला

जाईल, सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. V) या आदेशाचा उल्लंघन करणारे संबंधीत घटक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसल करणेस तसेच फौजदारी

कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित आस्थापना ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यंत बंद केली जातील. 14) शासकीय कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी, निवडून आलेले लोकप्रतिनीधी वगळून इतर अभ्यागतांना तातडीच्या

कामाशिवाय शासकीय कार्यालयामध्ये प्रवेश करणेस परवानगी असणार नाही. ज्या अभ्यागतांना बैठकीसाठी बोलविण्यात आलेले

आहे त्यांच्या बाबतीत विभाग/ कार्यालय प्रमुख यांनी विशेष पास निर्गमीत करणेत यावेत,

15) सर्व धार्मिक ठिकाणच्या व्यवस्थापन करणान्या विश्वस्त यांनी संबंधित धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये उपलब्ध असणारी जागा आणि पुरेसे सामाजिक अंतर राखले जाणेच्या दुष्टीकोनातून दर तासाला किती अभ्यांगताना प्रवेश देणेत येईल या संख्येची निश्चिती करून प्रसिध्द करणे, भाविक तसेच अभ्यागतासाठी ऑनलाईन आरक्षण किंवा इतर सोयीच्या पध्दतींचा वापर करणे, वरील ठिकाणी फक्त खालील प्रतिबंधास अनुसरून प्रवेश दिली जाईल याबाबत दक्षता घेणे.

I) मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. (NO Mask – No Entry)

II) सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही

व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.

III) प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर ठेवणेत यावीत. IV) सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान

केला जाईल, सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल.

16) परळी येथील श्री.वैद्यनाथ मंदिर व अंबाजोगाई येथील श्री.योगेश्वरी देवी मंदिर फक्त सकाळी 07.00 ते 12.00 वा. या कालावधीत उपरोक्त सुचनांच्या पालनासह दर्शनासाठी भावीकांकरिता खुले राहिल.

17) ठराविक निबंधासह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करणेत आलेली आहे. याचे उल्लंघन करणाच्या व्यक्ती, संबंधीत सार्वजनिक परिवहन प्राधिकरणाद्वारे रक्कम रु. 500/- दंडास पात्र राहतील.

18) राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा पूर्ववत निबंधासह (आदर्श कार्यपध्दती) पाळून चालू राहिल, बसमध्ये प्रवेश देतेवेळी NO Mask No Entry या तत्वाचा अवलंब करावा. बसमध्ये सॅनिटायझर व्यवस्था उपलब्ध करावी, सामाजिक अंतर

राखले जाईल याची काटेकोर दक्षता घ्यावी. याबाबतची सर्व जबाबदारी संबंधीत विभागीय नियंत्रक, म.रा.प.म., बीड यांची असेल. शक्यतो प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडे अन्टीजन/ आरटीपीसीआर तपासणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत असावे.

19) यापूर्वी कोव्हीड प्रादुर्भाव रोखने व कोव्हीड उपचार या अनुषंगाने वेळीवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित केलेल्या बाबी / क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 15/04/2021 पर्यंत अस्तित्वात राहतील.

20) कोविड-19 सकारात्मक व्यक्तीचे संपर्क शोधणे सकारात्मक चाचणी आलेल्या व्यक्तीचे लवकरात लवकर अलगीकरण

करणे. त्याचे संपर्क शोधून काढून त्यांचे अलगीकरण करणे, बंधनकारक असेल. अशा संपर्कातोल व्यक्ती किंवा कोविड-19 बाधीत रुग्णास गृह अलगिकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यास संस्थात्मक अल्लगीकरणात राहणे बंधनकारक करणेत येत आहे.

21) जिल्ह्यातील सर्व शैक्षणीक संस्था व सर्व कोचिंग क्लासेस या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत पुर्णतः बंद राहतील. फक्त इयत्ता 10 वी व 12 वी चे क्लासेस करिता 50% मर्यादेसह चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच फक्त इयत्ता 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षीक व लेखी सराव परिक्षा घेण्यास मुभा असेल.

22) विहीत केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना, चाचण्या आणि रुग्ण संपर्क शोधणे याची तंतोतंत अंमल बजावणी करण्याची संयुक्त जबाबदारी संबंधीत महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस आणि नगरपालिका या सर्व तसेच इतर सर्व संबंधीत विभागाची 23) दि.27,03.2021 चे मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय

मुंबई यांच्या आदशानुसार लॉकडाऊन कालावधीतील निबंधाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील,

You cannot copy content of this page