संतोष रत्नपारखी यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर
पालकमंत्री मेघना दिदी बोर्डिकरांच्या हस्ते शनिवारी होणार पुरस्काराचे वितरण
पूर्णा(प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी पूर्णा तालुक्यातील जि. प. प्रा. शा. कमलापूर येथील प्राथमिक शिक्षक संतोष अंगद रत्नपारखे यांची निवड करण्यात आली असून, शनिवारी २९ मार्च रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
परभणी जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने परभणी येथील भाग्यलक्ष्मी लॉन्स बेलेश्वर मंदिर परिसर नांदखेडा रोड येथे करण्यात आले आहे.सन २०२४-२५ चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार पूर्णा तालुक्यातून जि. प. प्रा. शा. कमलापूर येथे प्राथमिक शिक्षक संतोष अंगद रत्नपारखे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पूर्णा तालुक्यातून जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार रत्नपारखे यांना मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर, फुलकळस केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ.सिद्धार्थ मस्के,मुख्याध्यापक दयानंद स्वामी,सय्यद मोईन,नागनाथ नागरगोजे,गंगाधर कानोडे व्यंकटरमण जाधव यांच्या सह गटसाधन केंद्र पूर्णा येथील सर्व विषय तज्ञ व विशेष शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.