प्रा.बालाजी डाखोरे यांना मातृशोक
सौ.भागीरथीबाई डाखोरे यांचं दुःखद निधन
पूर्णा ता.३.(प्रतिनिधी)
येथिल श्री गुरुबुद्धीस्वामी उच्च महाविद्यालयाचे प्रा.बालाजी डाखोरे यांच्या मातोश्री सौ.भागीरथीबाई श्रीरंगराव डाखोरे यांचे मंगळवार ता.३ जून रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले असून, मृत्युसमयी त्यांचं वय ७० वर्ष होत.तालूक्यातील वाई तर्फे लासीना येथील रहिवासी अत्यंत मितभाषी, प्रेमळस्वभाव, वारकरी, शेतकरी कुटुंबातील भागीरथीबाई यांना मंगळवारी दुपारच्या वेळी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला यात त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी,दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.